इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकलिंग स्पर्धा’ संपन्न..

कुडाळ प्रतिनिधी

सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकलिंग स्पर्धा’ रविवारी कुडाळ येथे झाली. ७ व्या एडिशनमध्ये ६० कि.मी.च्या कोस्टल सायकलिंग स्पर्धेत ४० वर्षांवरील खुल्या पुरुष गटात मुंबईचा अनुप पवार व महिला गटात गीता यादव यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर १४ ते ४० पुरुष वयोगटात सिद्धेश पाटील व महिला गटात योगेश्वरी कदम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, मुंबई, गोवा, तामिळनाडू, भोपाळ
आदी विविध भागांतून ३५० सायकलपटूंनी सहभाग घेतला. तर २५ कि.मी.च्या फन राईडमध्येही उत्स्फूर्त सायकलपटूंचा सहभाग घेतला. कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या मैदानावर कोस्टल सायकलिंग स्पर्धा व फन राईडचे उद्घाटन रविवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पत्रकार शेखर सामंत, जि.प.चे माजी अध्यक्ष रणजित देसाई, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सेक्रेटरी अमोल शिंदे, कुडाळ सायकल क्लबचे रुपेश तेली, इव्हेंट चेअरमन शिवप्रसाद राणे, सचिन मदने, रेन्बो रायडर्सचे डॉ. बापू परब, कमलाकर घोगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी राहूल गायकवाड, डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. जी. टी. राणे, लायन्स क्लब ऑफ कुडाळचे डॉ. अमोघ चुबे, अॅड. विवेक मांडकूलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
६० किमी कोस्टल सायकलिंग स्पर्धेला व २५ किमी.ची फन राईडसाठी सिंधुदुर्ग पोलिस, आरोग्य विभाग, कुडाळ पोलिस, मुळदे कृषि महाविद्यालय व संत राऊळ महाराज महाविद्यालयचे एनसीसी कॅडेटस, सर्व पत्रकार व मीडिया, सर्व प्रायोजक आदींनी मोलाचे योगदान दिल्यानेच भव्य इव्हेंट यशस्वी झाल्याचे सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांनी सांगितले. स्पर्धेचा निकाल – ६० किमी कोस्टल
कुडाळ : सायकलिंग स्पर्धेतील विजेत्यांसमवेत मान्यवर. ७५ वर्षीय रामदास जाधव मुंबईहून सायकलने सहभागी
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील प्रोफेशनल फोटोग्राफर्स टीम ड्रोन कॅमेरासह इव्हेंन्टमध्ये सहभागी झाली होती. ७५ वर्षीय रामदास जाधव हे मुंबईहून ५५० किमी. सायकलिंग करत कुडाळ स्पर्धेत सहभागी झाले होते.
सायकल स्पर्धेत ४० वर्षावरील वयोगटात (पुरूष) प्रथम मुंबईचा अनुप पवार, द्वितीय सतीश सावंत (पुणे), तृतीय किरण पवार (मुंबई), ४० वर्षावरील महिला वयोगटात प्रथम गीता यादव (मुंबई), द्वितीय वर्षा येवले (पुणे), तृतीय मुग्धा सामंत (रत्नागिरी), १४ ते ४० पुरूष वयोगटात प्रथम सिध्देश पाटील (कोल्हापूर), द्वितीय यश थोरात (पुणे), तृतीय विन्सेन गोडॉल (गोवा).
१४ ते ४० महिला वयोगटात प्रथम योगेश्वरी कदम (सिंधुदुर्ग), द्वितीय श्रावणी घोडेस्वार (कोल्हापूर), तृतीय सृष्टी कुंभोज (रत्नागिरी) यशस्वी झाले. या सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र, रोख पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.
देशभरातील सायकल ग्रुपचा सन्मान महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश अशा देशभरातील सायकल ग्रुप प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सतीश सावंत ग्रुप पुणे, अनुप पवार ग्रुप मुंबई, रत्नागिरी सायकल क्लब, नवनीत वरळीकर ग्रुप मुंबई, हनुमान चोपडे ग्रुप कोल्हापूर, रामदास जाधव भोईसर, श्रावणी घोडेस्वार कोल्हापूर, किरण शिंदे ग्रुप मुंबई, आनंदसिंघ मेहरा भोपाळ मध्यप्रदेश आदींचा सन्मानचिन्ह देवून
सन्मान करण्यात आला. सायकल चळवळीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान
सायकल चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या कुडाळ तालुक्यातील घावनळे खुटवळवाडीचे वारकरी ७५
वर्षीय सायकलपटू वसंत रामचंद्र नाईक, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे संस्थापक उमेश गाळवणकर, कोस्टल सायकलिंग स्पर्धेत विशेष योगदान देणारे प्रथमेश सावंत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भेट देत सायकलपटूंचे अभिनंदन केले.