घरातून २ मोबाइल आणि मंगळ सूत्र जप्त; काय आहे नेमके प्रकरण ?

दरम्यान या खुनाच्या घटनेत संशयित फर्नांडिस हा एकटाच आहे की आणखी कोणी सहभागी आहेत? याबाबत पोलिस तपास करत आहेत. संशयिताला आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने पोलिस या सर्व प्रश्नांच्या मुळाशी ओसरगाव येथे महामार्गानजीक खून करून जाळलेल्या किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सुभाष सोपटे (वय ५९) यांच्या खून प्रकरणी अनेक सवाल अद्यापही अनुत्तरीतच आहेत. शनिवारी कणकवली पोलिसांनी
या खुनातील संशयित वितोरीन फर्नांडिस (रा. वेंगुर्ले टांक) याच्याकडे केलेल्या सखोल तपासात त्याने त्याच्या वेंगुर्लेतील घरी ठेवलेले सुचिता सोपटे हिचे दोन मोबाईल, तिच्या जावेचे मंगळसूत्र आणि विकलेले काही दागिने हस्तगत केले. जाळले त्याठिकाणी तिचा खून केला असेही तो सांगत आहे. त्याला पोलिस घटनास्थळी नेवून तपास करणार आहेत.
संशयिताने हा खून दागिने व पैशांच्या हव्यासापोटी केल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत आहे. मात्र तो विसंगत माहिती देत आहे. कधी तो आपण कर्जबाजारी असल्याचे सांगतो तर कधी वेगळीच माहिती देत आहे. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय? त्याने खून नेमका कोणत्या कारणासाठही केला याचा तपास पोलिस करणार आहेत. संशयितांने खून केलेल्या महिलेला घटनेच्या अगोदर कोल्हापूरसह ठिकठिकाणी इर्टिगा गाडीतून फिरवले. तिचा खून त्याने नेमका कोणत्या हत्याराने केला? आणि कुठे केला? त्याचा कट कधी रचला? या कटात आणखी कोणी सहभागी आहेत का? याचाही तपास पोलिस करणार आहेत.
खून झालेली सुचिता सोपटे हिने संशयितासोबत कोल्हापूरला जाताना आपण एका कार्यक्रमासाठी जात असून यासाठी तिने जावेचे मंगळसूत्र घेतले होते. हे मंगळसूत्र आणि तिचे दोन मोबाईल आरोपीकडे होते. ते पोलिसांनी हस्तगत केले तर बांगड्यांसह काही दागिने त्याने विकले होते तेही पोलिसांनी हस्तगत केले. रविवारी संशयिताला घटनास्थळी नेवून तपास केला जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.