प्रतिनिधी / ललना थोरात , कोकणशाही
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गसह राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.IMD कडून अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग आणि इतर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेत सोमवारी आणखी वाढ झाली आजही अशीच तीव्र गर्मी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढत असून, येत्या 3 दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात वाढत्या उष्णते मुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकता त्या मुळे उन्हाळ्यात आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे ,
सोबतच वाढत्या उष्णतेमुळे आपण आपली काळजी कशी घेऊ शकता या साठी काही खास टिप्स तुमच्या साठी –
* टिप नंबर १ – भरपूर पाणी प्या आपल्या शरीराला हायड्रेट ठेवा , तुम्ही थंड शीत पेय उन्हाळ्यात घेऊ शकता , कॅफिन युक्त पेय शक्यतो उन्हाळ्यात टाळा , लिंबू पाणी ऊसाचा रस यांसारखे शीत पेय घेऊन तुम्ही तुमचं शरीर हायड्रेट ठेवू शकता.
*टिप नंबर २- घरा बाहेर पडताना उन्हा पासून बचाव करण्यासाठी छत्री चा वापर करा ; शक्यतो सुती कपड्यांचा वापर उन्हात करा सैल कपडे वापरण्यावर लक्ष द्या जेणे करून बाष्पीकरण होऊ शकेल ,घरा बाहेर पडताना चेहऱ्याला तुम्हाला जशी सूट होईल त्या प्रकारे सनस्क्रिन वापरा , सनग्लासेस चा वापर करा ,
टिप नंबर ३– पाणीदार फळांचा आपल्या आहार मध्ये वापर करा
*टिप नंबर ४ – उन्हातून घरी गेल्या वर लगेच पाणी न पिता थोड्या वेळ बसा आणि मग गुळ पाणी घ्या त्या मुळे शरीराला थंडावा मिळेल,
*टिप नंबर ५ – उन्हाळ्यात डीहायड्रेशन सारख्या म्हणजेच उलट्या जुलाब, अतिसार यांसारख्या समस्या होऊ शकतात त्या साठी आपला अन्न आहार शक्यतो साधाच ठेवा , तिखट चमचमीत पदार्थ आणि बाहेर चे पदार्थ खाणे शक्यतो टाळा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि आणि उन्हाळ्यात अतिसार जुलाब यांसारख्या समस्या देखील उद्भवणार नाही.
आपल्या स्वतःची काळजी घ्या आणि उन्हा पासून स्वतःचे संरक्षण करा.









