रत्नागिरी मार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार…

साडवली:

सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास देवरुख रत्नागिरी मार्गावर स्नागझरी निवेबुद्रुक येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत युवकाचे नाव मिलन जसबीर बोहरा असे असून तो मूळचा नेपाळचा आहे. मिलन बोहरा हा युवक बजाज पल्सर हे दुचाकी वाहन चालवीत होता तर नितीन कृष्णा मोहिते (४१) बोलोरो पिकअप
चारचाकी वाहन चालवीत होते. दुचाकीस्वार रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होता. रात्री साडे अकराच्या सुमारास या दोन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक झाली.
या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. मंगळवारी देवरूख पोलिस ठाणे येथे संबंधित अपघाताची नोंद करुन नितीन कृष्णा मोहिते या बोलोरो पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे.