कणकवली पोलिस व एलसीबी सिंधुदुर्ग यांची धडाकेबाज कारवाई
कणकवली :
एसटी बसस्थानक तसेच रेल्वेस्टेशनवर गाडीमध्ये चढणाऱ्या वयोवृद्ध महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या गर्दीचा फायदा घेवून चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्हयाचा कणकवली पोलिस व एलसीबी सिंधुदुर्ग यांच्याकडून समांतर तपास सुरु केला होता. तपासा दरम्यान दोन्ही विभागांच्या पोलिसांनी अंबरनाथ पश्चिम, वांद्रा पाडा येथून प्रीतम देवदास गायकवाड (३५) याला ताब्यात घेवून त्याला कणकवली पोलिस स्टेशनवर आणले. दोन्ही विभागाच्या पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे चोरटा जेरबंद झाला.
गेल्या काही दिवसापासून कणकवली शहरांमध्ये काही अज्ञातांकडून एसटी बस व रेल्वेमध्ये चढणाऱ्या वयोवृद्ध महिलांचे हातातील सोन्याच्या बांगड्य, गळ्यातील दागिणे चोरीचे प्रकार घडत होते. सदर गुन्ह्यांचा कणकवली पोलीस ठाणे व एलसीब कडून समांतर तपास सुरू असताना घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही संशयितांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
यातील संशयित हा वांद्रापाडा, अंबरनाथ (पश्चिम), जिल्हा ठाणे येथे वास्तव्यास असलेची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे १८ व १९ फेब्रुवारी रोजी अंबरनाथ- वांद्रापाडा येथे कणकवली पोलीस व एलसीबी पोलिस यांनी संयुक्त शोध मोहीम राबविली. पोलिसांच्या मोहिमेला यश येत एक आरोपी प्रीतम देवदास
कणकवली: चोरट्याला पोलिस स्टेशनवर आणताना पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक आर. बी. शेळके व कर्मचारी.
गायकवाडयाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने इतर साथीदारासह सदर गुन्हे केले असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अति. पोलिस अधीक्षक ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, सहा. पोलिस फौजदार श्री. कोयंडे, पोलिस हवालदार श्री. देसाई यांच्या पथक केली.










