कुंभारी टोल नाक्यावर बसचा मोठा अपघात…

देवगड-

देवगड आगारातून सकाळी ६.४५ वाजता सुटणाऱ्या देवगड-अक्कलकोट बसला १६ फेब्रुवारी रोजी सोलापूर ते अक्कलकोट या मार्गावर अपघात झाला. कुंभारी टोल नाका येथे पथकर भरण्याकरिता वाहने उभी
असताना पुढे उभे असलेल्या कंटेनरला जाऊन बस मागून धडकली. यात एसटी चालकासह गाडीतील सुमारे ५ ते ६ प्रवाशांना दुखापत झाली असून नजीकच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती एसटी प्रशासनामार्फत प्राप्त झाली आहे. सोलापूर-अक्कलकोट मार्गावरील कुंभारी टोल नाका येथे सायंकाळी ७ वा. च्या सुमारास हा अपघात घडला. एसटीची धडक समोर उभया असलेल्या कंटेनरला बसल्यामुळे कंटेनर त्यापुढे उभे असलेल्या तीन वाहनांना धडकला.