देवगड
आपण हवाईमार्गे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. हा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिली.देवगडचे माजी आमदार स्व. जनार्दन मोरेश्वर तथा आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप समारंभ कार्यक्रमाला ना. गडकरी सिंधुदुर्गात आले होते. यावेळी ते बोलत होते.मुंबई-गोवा हा बहुचर्चित मार्ग कित्येक वर्षे अपूर्ण अवस्थेतच आहे. त्यामुळेअनेकवेळा अपघात झाले आहेत. यामध्ये अनेक जायबंदीही झाले आहेत. तसेच वाहतूक कोंडी व धोकादायक वाहतूकही नित्याचीच आहे. त्यामुळे कोकणात येणारे व मुंबईकडे जाणारे पर्यटक, प्रवासी मेटाकुटीला आले होते.या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गडकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी येणार असल्याने त्यांनी या मार्गाची पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पाहणी अंती मंत्री गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे वक्तव्य केल्याने कोकणवासीयांत समाधान दिसून आले.महामार्गाचे काम पावसाळ्याआधी पूर्णपसरले आहे. यावेळी गडकरी म्हणाले, जलवाहतूक ही तोट्याची ठरत असल्याने सी-प्लेन हा उत्तम उपाय असून ही वाहतूक कोकण किनारपट्टीवर कोणताही निधी खर्च न करता आपण सुरू करून देवू. यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांना दिले आहे. आप्पा गोगटे यांचे स्वप्न असलेला इळये वरंडवाडी पुलाला केंद्रीय मार्ग निधीमधून निधी देवू असे आश्वासन ना. गडकरी यांनी दिले. त्याचप्रमाणे वॉटर कार हा प्रकल्पही अंतिम टप्प्यात असून रस्त्यावरून पाण्यात व पाण्यातून पुन्हा रस्त्यावर फिरणारी बस लवकरच कोकण किनारपट्टीवर आपण सुरू करूया, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.










