ब्युरो न्युज कोकणशाही
येत्या सहा महिन्यांमध्ये इलेक्ट्रीक, पेट्रोल आणि डिझेल वाहनांची किंमत सारखी असेल, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिली. तसेच देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्या १०० टक्के इॲनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणत आहेत. या गाड्यांद्वारे कुठलेही प्रदूषण होत नाही तसेच या गाड्या ६० टक्के ऊर्जा निर्माण करतील, आता अनेक लोकांना इलेक्ट्रीक गाडी मिळण्यासाठी वाट बघावी लागते, असेही गडकरी म्हणाले. नितीन गडकरी म्हणाले की, लिथियम आयन बॅटरी आणल्यानंतर बॅटरीची किंमत कमी झाली आहे. आधी ही किंमत १५० डॉलर प्रति किलो वॅट प्रति तास होती, आता ती किंमत १०५ प्रति किलो वॅट प्रति तास होईल. यानंतर डिझेल- पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या आणि इलेक्ट्रिक गाड्या या सगळ्यांची किंमत ही सारखीच असणार आहे. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. येणाऱ्या काळामध्ये पुर्णपणे इलेक्ट्रिक वाहने चालतील. सबंध देशात इलेक्ट्रीक वाहनांचा खप चांगला होत आहे. अनेक लोकांना इलेक्ट्रिक गाडी मिळवण्यासाठी वाट बघावी लागत आहे… पुढच्या ५ वर्षांमध्ये दिल्लीमध्ये सगळ्या बसेस इलेक्ट्रिक असतील. आता इलेक्ट्रिक ट्रक देखील आहेत येत आहेत. दरम्यान, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ५०० इलेक्ट्रिक गाड्या घेतल्याचे सांगितले आहे. देशात येणाऱ्या काळात १ लाख इलेक्ट्रिक बसेस बनतील, असेही ते म्हणाले.










