नांदगाव तळेरे – कासार्डे – पियाळी रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. दशक्रोशीतीत मुंबई-गोवा महामार्गानंतर प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता सिमेंट काँक्रीटने बनविण्यात येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारा हा रस्ता रुंदीकरणासह, मातीकाम, खडीकरण, मजबुतीकरण, काँक्रीट रस्ता, सेवा वाहिन्यांचे स्थानांतरण, संरक्षक भिंत, कच्चे गटर्स, मुरूम बाजूपट्टी अशी कामे होणार आहे. सुमारे 8 कि.मी. रस्त्यासाठी 2 कोटी 50 लाख रकमेला प्रशासकीय मान्यता सा. बां. विभागाने दिली आहे. उर्वरीत रस्ता व जि. प. बांधकाम, ग्रामपंचायत अखत्यारितील मायनिंग क्षेत्रातील रस्ता सिमेंट काँक्रीट व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.भाजपचे कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, जि.प. माजी सदस्य संजय देसाई, माजी सभापती संतोष कानडे, सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते, युवामोर्चा तालुकाध्यक्ष सहदेव ऊर्फ अण्णा खाडये, माजी सरपंच संतोष पारकर, भाजपा महिला आघाडी माजी जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, सोसायटी चेअरमन दीपक सावंत, राजकुमार पाताडे, नीळकंठ पाताडे, सहदेव मस्के, किशोर कुडतरकर, शांताराम जाधव, राजा देसाई, सत्यवान केसरकर, गोट्या पाताडे, सनी पाताडे, विजय नकाशे याच्यासह भाजपा पदाधिकारी,कायकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.










