क्रिकेट सामन्याच्या दरम्यान मैदानावर क्षेत्ररक्षण करीत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सावंतवाडीतील जेष्ठ पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन झाले. ही घटना काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ओरोस येथे घडली. त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मांजरेकर यांनी कॉलेज जीवनापासूना पत्रकारितेला प्रारंभ केला. प्रारंभी ‘तरुण भारत’चे सातार्डा वार्ताहर, त्यानंतर बांदा प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. नंतर काळात ते सावंतवाडी कार्यालयात उपसंपादक म्हणून रुजू झाले. या काळात त्यांनी विपुल लेखन केले. त्यांना पत्रकारितेसाठी सावंतवाडी तसा जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कारही मिळाले होते. अलिकडेच त्यांची जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव म्हणून निवड झाली होती. तर त्यांनी याआधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.कॉलेज जीवनापासून त्यांना नाटयक्षेत्राची आवड होती. दरवर्षी राज्य नाटय स्पर्धेत ते नाटके सादर करत. त्यांनी स्वतःच्या दिग्दर्शनाखाली विविध नाटके सादर केली होती. विविध नाटय, एकांकिका स्पर्धांसाठी परीक्षक म्हणूनही ते काम पाहत असत. सावंतवाडी तालुका भंडारी समाज संघटना कार्यातही त्यांचा सहभाग असे. त्यांच्या पश्चात्त आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. आरोस येथील विद्याविहार हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. सुषमा मांजरेकर – गोडकर यांच होत. आज त्यांच्या वर सावंतवाडी सतोसे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुली असा परिवार आहे..










