Category बातम्या

आजपासून फास्टॅग साठी नवीन नियम लागू…

मुंबई : प्रतिनिधी १७ फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून फास्टॅग साठी नवीन नियम लागू होत आहेत. याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशन नियम जाहीर केले आहेत, जे १७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणार आहे. नव्या नियमांनुसार फास्टॅग व्हाइटलिस्टेड…

नगरपरिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायो टॉयलेटची आ. निलेश राणे यांनी केली स्वखर्चाने दुरुस्ती….

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. काही दिवसांपूर्वी आ. राणे यांनी शहराचा स्पॉट पंचनामा केला असता शहरात पालिकेच्या वतीने बसवण्यात आलेल्या बायो टॉयलेट आणि घनकचरा मशीनची दुरावस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.…

राजकोट येथे होणार ‘शिवजयंती’ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी

ओरोस ; मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ब्राँझ धातूच्या उभारणीच्या कामाचा पायाभरणी समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी किल्ले राजकोट येथे होणार आहे.या कार्यक्रमासाठी खा. नारायण राणे, आ. दीपक केसरकर,…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ढाल बनू ; मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रत्नागिरी जिल्हा सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अन्य जिल्ह्यांसाठी वेळ द्यावा. सिंधुदुर्गात आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि येथे आम्ही सर्व आमदार असूच. आम्ही या निवडणुकांमध्ये तुमच्यापुढे ढाल बनून या…

बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा; 800 हून अधिक मुलांचा गौरव…

कुडाळ , प्रतिनिधी शासन दरबारी बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत या सर्वांचा अभ्यास बांधकाम कामगारांनी करून या संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी बांधकाम कामगारांच्या भव्य मेळाव्यात…

कवठी देऊळवाडी येथील पुलाच्या कामाचे रणजित देसाई यांच्या हस्ते भूमीपूजन

कवठी देऊळवाडी येथील पुलाच्या कामाचे रणजित देसाई यांच्या हस्ते भूमी पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कवठी देऊळवाडी ते गावकरवाडी (दलित वस्ती)कडे जाणाऱ्या रस्त्यावर देऊळवाडी (जांभाचा वहाळ ) येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्याचे तात्कालिन…

एम.आय.टी.एम.अभियांत्रिकी महावि‌द्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उ‌द्घाटन ; जिल्हा पोलीस अधीक्षकांची उपस्थिती

जयवंती बापू फाउंडेशन संचलित एम.आय.टी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्‌द्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सौरशकुमार अग्रवाल उपस्थित होते. यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उ‌द्घाटन करण्यात…

तपस्वी गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन

शास्त्रीय, नाटय अभंग या तीनही संगीत प्रकारावर विलक्षण हुकमत असलेले, आपल्या भावपूर्ण गायन शैलीने चार दशकांहून अधिक काळ रसिकांना आनंद देणारे तपस्वी गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांचे ‘प्रिये पाहा’ नाटय़गीत खूप…

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महावि‌द्यालयचा रेक्स 2025 व मेट्रोपल्स 2025 उ‌द्घाटन सोहळा संपन्न !

सुकाळवाड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महावि‌द्यालयामध्ये रेक्स 2025 व मेट्रोपल्स 2025 उ‌द्घाटन.विविध विभागातून विद्यार्थ्यांचा सहभाग जयवंती बाबू फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे रेक्स व मेट्रोपल्स या टेक्निकल व नॉन टेक्निकल कार्यक्रमाचे उ‌द्घाटन सिंधुदुर्गातील उ‌द्योजक श्री. अनंत सावंत यांच्या हस्ते…

अखेर राजन साळवी यांचा शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश…

उद्धव गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजन साळवी आणि त्यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. राजन साळवी यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे कोकणात उद्धव गटाला खिंडार पडले आहे.…