मित्रांसोबत पार्टी करणं आलं अंगाशी तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू…

माजगाव

सरमळे पुलानजीक मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आलेल्या माजगाव तांबळगोठण येथील निखिल सूर्यवंशी (वय ४८) हा तरुण नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
माजगाव येथील काही युवक पार्टीच्या उद्देशाने सरमळे नदीवर गेले होते. या दरम्यान ते आंघोळीसाठी नदीच्या डोहात उतरले होते. पोहत असताना निखिल याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही बाब सहकाऱ्यांनी स्थानिकांच्या कानावर घातली.या नंतर सरमळे पोलीस पाटील दीपक कांबळे यांनी घटनास्थळी दाखल होत बांदा पोलिसांना खबर दिल. त्यानंतर बांदा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल श्री. कुडतरकर घटनास्थळी दाखल झाल. त्यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने निखिल याचा मृत देह पाण्याबाहेर काढला. नदीचा डोह खोल असल्याने युवकांना मृतदेह सापडत नव्हता. त्यानंतर लगतच्या विलवडे गावातील युवक अर्जुन गोपाळ दळवी याने राकेश नार्वेकर, सचिन राऊळ यांच्या साथीने मृतदेह पाण्या बाहेर काढला. मृतदेह विच्छेदनादनासाठी बांदा आरोग्य केंद्रात नेण्यात आला. निखिल हा माजगाव येथील अनेक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर होता. तो अनेक वर्ष माजगाव नाला नवरात्रोत्सव मंडळाचा अध्यक्षही होता. पार्टी साठी आलेल्या युवकाचा प्रथम दर्शी मृत्यू हा बुडून झाला असला तरी नेमकी घटना काय घडली, याचा तपास बांदा पोलीस करत आहेत.