नारिंग्रे सोसायटीत १७ लाखांचा अपहार : सचिवावर गुन्हा

देवगड

देवगड तालुक्यातील नारिंग्रे विविध कार्यकारी सेवा सोसायटीत १६ लाख ९१ हजारांचा अपहार झाल्याची फिर्याद शासन नियुक्त लेखापरीक्षक गणेश एकनाथ सारंग (३९, रा. आडबंदर मुणगे, ता. देवगड) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.
याप्रकरणी संशयित उमेश चंद्रकांत कदम (३१, रा. नारिंग्रे) या संशयिताविरुद्ध देवगड पोलिस
स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत घडली आहे. फिर्यादीत सारंग यांनी म्हटले आहे की, संशयित हा नारिंग्रे सोसायटीमध्ये सचिव म्हणून सन २०१८ ते २०२३ या कालावधीत कार्यरत होता. त्याने संस्थेची दप्तर अद्ययावत ठेवणे, जमाखर्च नोंदी ठेवणे, संचालक मंडळाच्या ठरावा प्रमाणे पैसे खर्च करणे, सचिवावर गुन्हा संस्थेची सर्व पुस्तके, हिशोब लिहिणे इत्यादी कर्तव्य हेतुपुरस्सर लबाडीने करून संस्थेची बनावट आर्थिक पत्रके तयार केली. तसेच १६ लाख ९१ हजार ५५२ रुपयांचा अपहार केला असून सदर रक्कम आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. संशयिताने संस्थेची व सभासदांची आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास देवगड पोलिस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.