आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर आयोजन ‘शिवायन’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन कुडाळ- मालवणचे आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग मैदानावर करण्यात आले आहे. या महानाट्याच्या भव्य रंगमंचाच्या उभारणी कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, सिंधुदुर्ग बँक संचालक बाबा परब, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपगराध्यक्ष राजू वराडकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवा उद्योजक प्रितम गावडे, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवामोर्चा शिवायन महानाट्याच्या भव्य रंगमंचाच्या उभारणी कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले..शहराध्यक्ष ललित चव्हाण, शिवसेना महिला उपाजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, आशा वळपी, अंजना सामंत, राणी पराडकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्याआणि त्यांच्या मर्द मावळ्यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या हिंदवी स्वराज्य निर्मितीची वैभवशाली कथा. शिवपूर्व काळापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंतच्या अनेक प्रसंगाच्या नाटकातून सादरीकरण म्हणजेच ‘शिवायन ऐतिहासिक महानाट्यासाठी ७२ फूट बाय ४० फूट असा भव्य रंगमंच व किल्ल्याचे भव्य नेपथ्य साकारण्यात येणार आहे. ४०० फूट बाय ४०० फूट भव्य प्रेक्षागृहासह १०० पेक्षा अधिक कलाकारांचा या महानाट्यामध्ये सहभाग असणार आहे. अत्याधुनिक ध्वनी आणि प्रकाशयोजना, आकर्षक व नेत्रदीपक आतषबाजी, उत्कृष्ट संगीताने सजलेले हे महानाट्य एकाच वेळी आठ ते दहा हजार प्रेक्षकांना पहाता येणार आहे. श्री भवानी देवीची मूर्ती, आकर्षक सिंहासन व इतर नेपथ्य अशी अनेक वैशिष्ट्ये या महानाट्याची आहेत. या महानाट्यामध्ये घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर केला जाणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. शिवपूर्वकाळते राज्याभिषेकापर्यंतच्या अनेक प्रसंगांचे सादरीकरण यां महानाट्यातून होणार आहे.









