Category बातम्या

कोकण बाजार विक्री प्रदर्शन पुन्हा एकदा कोकणच्या अस्सल उत्पादनांसह तुमच्या सेवेत हजर! – 12 व 13 एप्रिल 2025, स्काऊट हॉल, दादर

कोकण बाजार विक्री प्रदर्शन – 12 व 13 एप्रिल 2025, स्काऊट हॉल, दादर मुंबई – कोकण बाजार विक्री प्रदर्शन पुन्हा एकदा कोकणच्या अस्सल उत्पादनांसह तुमच्या सेवेत हजर! येत्या 12 व 13 एप्रिल 2025 रोजी स्काऊट हॉल, शिवाजी पार्क, दादर येथे…

देवगड येथील वकील शामसुंदर विठ्ठल जोशी यांची नोटरी पदी निवड

देवगड येथील वकील श्री शामसुंदर विठ्ठल जोशी हे गेली सुमारे 27 वर्षे वकील व्यवसायात कार्यरत असून त्यांची भारत सरकार नवी दिल्ली यांचेकडून नोटरी पब्लिक या महत्त्वाच्या पदावर (रजिस्टर नंबर 50120 दिनांक 1/4/ 2025 रोजी )नेमणूक करण्यात आलेली आहे देवगड तालुक्यामध्ये…

रोणापालच्या उपसरपंचपदी भाजपाचे योगेश अशोक केणी यांची बिनविरोध निवड ; बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी यांनी दिल्या शुभेच्छा

बांदा प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावचे विद्यमान उपसरपंच कृष्णा परब यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आज उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. प्रतिभा आळवे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश केणी यांचा एकमेव…

सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा आता आठवड्यातून पाच वेळा – फ्लाय९१ने वाढवली उड्डाणांची संख्या

कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास अधिक सुलभ; फ्लाय९१ने वाढवली सिंधुदुर्ग-पुणे उड्डाणांची संख्या पणजी, एप्रिल २०२५: प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, गोवा स्थित फ्लाय९१ विमानसेवेनं सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील सेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी…

पोलीस, आर्मी ,वनरक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसाची मोफत कार्यशाळा – महेंद्रा अकॅडमीचा पुढाकार

राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे करणार मार्गदर्शन सावंतवाडीमहेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस आर्मी आणि वनरक्षक भरतीसाठी स्पेशल पाच दिवसाची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.या कार्यशाळेला राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे मार्गदर्शन करणार आहेत विशेष म्हणजे या कार्यशाळेत प्रथम पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले…

वाळू वाहतुकीचे डंपर म्हणजे साक्षात ‘यमराज’! ; प्रशासन लक्ष देणार कधी?

साईनाथ गांवकर / (मुख्य संपादक- कोकणशाही) सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परगावात अन शेजारच्या गोवा राज्यात जाणाऱ्या वाळू वाहतुकीच्या डंपरची संख्या वाढली आहे. या डंपर मध्ये भरली जाणारी किती वाळू अधिकृत आहे अन किती वाळू अनधिकृत उपसा केलेली आहे ते फक्त त्या वाळू…

कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनच्या एकूण ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान – आ. निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न.

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली…

धक्कादायक ; १० महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला ; महिला मजुरांचा मृत्यू…

ब्युरो न्यूज कोकणशाही नांदेड जिल्ह्यातील आसेगाव मध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला आहे. यामध्ये हळद काढणी करणाऱ्या १० महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला. यामध्ये ७ महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील सर्व महिला मजूर या हिंगोलीतील गुंज…

देवगड आगारात नव्याने दाखल झालेल्या लालपरीचे भाजप पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत…

देवगड : देवगड आगारात नव्याने दाखल झालेल्या लालपरीचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून, पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने या गाड्या देवगड आगारात नव्याने दाखल झालेल्या आहेत. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, देवगड मंडल अध्यक्ष राजू शेट्ये,…

बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ताडगोळे दाखल…

ब्युरो न्यूज कोकणशाही डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ताडगोळे दाखल झालेत. यामध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांची विक्री सुरू होत असून महालक्ष्मी मंदिर परिसरात ताडगोळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी गुजरात, मुंबई कडील येणारे भाविक व ग्राहकांचा ताडगोळे…