Category बातम्या

मोहरम, जयंती आणि आंदोलने पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी १० जून रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २४ जून रोजी २४ वाजेपर्यंतच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

वेंगुर्लेतील क्रॉफर्ड मार्केटमधील भाडेवाढीला ब्रेक लावा; दीपक केसरकरांची शिंदेंकडे मागणी

वेंगुर्ले : शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार वेंगुर्ले नगरपालिकेने क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानगाळ्यांची अनामत रक्कम व भाडेवाढ करण्यासाठी दुकान मालकांना नोटीसा जारी केल्या आहेत. ही भाडेवाढ वेंगुर्ल्यासारख्या छोट्या शहरातील व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असून ती तत्काळ स्थगित करण्यात यावी, तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे,…

शॉर्टसर्किटचा संशय; काही मिनिटांत आगीने घेतले रौद्ररूप

कुडाळ : कुडाळ शहरातील केळबाईवाडी नजिक असलेल्या वाघसावंत टेंब येथील एका घराला गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत घराच्या माडीवरील खोलीसह तेथे राहणाऱ्या नाईक या भाडेकरू कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने खोलीतील…

आचर्‍यात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामस्थांचे निवेदन

आचरा : मोकाट गुरांचा प्रश्न आचरा गावात भेडसावत आहे. याबाबत तात्काळ बंदोबस्त करुन केलेल्या कारवाईची माहिती देण्याची मागणी रुपेश टेमकर यांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामविकास अधिकारी माधुरी कामतेकर यांच्याकडे केली आहे. यावेळी रुपेश मंगेश टेमकर यांच्यासोबत गणेश पाटकर, दर्पण आचरेकर, गौरव…

देवाच्या भूमीत वाळूमाफियांचा धुडगूस?; कुणकेश्वरात ग्रामस्थांचा एल्गार

देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर समुद्रकिनारी सुरू असल्याचा आरोप असलेल्या कथित अवैध वाळू उपशामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर वरचीवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत समुद्रकिनारी सुरू असलेल्या वाळू उपशाच्या प्रकाराला तीव्र विरोध…

मोदींच्या दीर्घायुष्यासाठी अंबे माता मंदिरात विशेष प्रार्थना; राणे कुटुंबीयांची उपस्थिती

देशाचे कार्यकुशल पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या सेवा, सुशासन आणि जनकल्याणाच्या १२ वर्षांच्या यशस्वी तपपूर्तीनिमित्त अंबे माता मंदिरात माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार मा. श्री. नारायणराव राणे साहेब आणि मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश…

पाच वर्षांनंतर उलगडलं फोंडाघाटचं रहस्य; अपघात नव्हे तर खून!

कणकवली : 28 डिसेंबर 2021 रोजी फोंडाघाटातील खोल दरीत एका अज्ञात इसमाचा विल्हेवाट लावलेल्या स्थितीतील मृतदेह घाट परिसरात सेल्फीसाठी थांबलेल्या काही युवकांना दिसून आला होता. त्याच्याच बाजूला एक मोटरसायकलही आढळून आल्याने प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे वाटले होते. मात्र, पाच वर्षांनी…

⚡ कुडाळ नगरपंचायतीचा मोठा निर्णय; घरपत्रक उतारा आता ऑनलाईन

मालमत्ता कर पूर्ण भरणे बंधनकारककुडाळ : कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात आता घरपत्रक उतारा (असेसमेंट उतारा) ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या नव्या डिजिटल प्रक्रियेला नगरपंचायतीकडून अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. मात्र, हा ऑनलाईन उतारा मिळवण्यासाठी नागरिकांना चालू आर्थिक वर्षाचा…

सेल्फी पॉईंटजवळ निकृष्ट काम? मोती तलाव फुटपाथ वादाच्या भोवऱ्यात

सावंतवाडी : शहरात सुरु असणार फुटपाथच काम बोगस पद्धतीने सुरु असून सेल्फी पॉईंटजवळ कॉक्रीटीकरण न करता पेवर ब्लॉग्स बसविण्यात आलेत. तर संस्थानकालीन तलावाशी जोडल्या गेलेल्या मुशीत असणारे सिमेंटचे पाईप ठेकेदाराने फोडले असून त्यावर निकृष्ट दर्जाच्या फरशा बसविण्यात येत आहेत. पुढील…

अखेर प्रशासन जागे झाले! शिरोडा महामार्गावरील धोकादायक झाडे हटवली

सावंतवाडी : शिरोडा महामार्गावर निरवडे झरबाजार नजीक जुन्या कौल फॅक्टरी समोर रस्त्याच्या दुतर्फा वाळलेली आणि वाहतुकीस धोकादायक ठरणारी आकाशियाची झाडे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवित रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे.ग्रामस्थांची आणि वाहनधारकांची असलेली मागणी लक्षात घेता बांधकाम विभागाने दाखवलेल्या…