कोकणशाही

कोकणशाही

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर; विविध विकासकामांचा आढावा घेणार

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार, ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्गनगरीत विकासाला नवी दिशा – आठवडा बाजाराचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे काळाची गरज होती. ओरोस एस.टी. स्टैंड परिसरात सुरू करण्यात आलेल्या “अस्सल गावठी आठवडा बाजारामुळे” आता प्राधिकरण क्षेत्राला स्वतःची…

पालघरच्या सातपाटीत भव्य मत्स्यबंदर विकास प्रकल्पाचा शुभारंभ

पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे मासेमारी बंदर असलेल्या सातपाटी येथील मत्स्यबंदर विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहून राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गणेशजी नाईक यांच्यासमवेत सदर प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. सातपाटी खाडीच्या…

वेताळ प्रतिष्ठानचे ३८वे रक्तदान शिबिर उत्साहात; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले : महाराष्ट्र शासन महसूल विभाग आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या निमित्ताने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे सलग 38वे रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.”रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा…

बापर्डे खैराटवाडीत भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अंत

देवगड : बापर्डे खैराटवाडी येथील तीव्र उताराच्या रस्त्यावर दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या पडेल नरगोलवाडी येथील रमेश सिताराम बाणे (वय ५२) यांचे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास…

पालकमंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश ; देवगडमध्ये उभे राहणार पर्यटन हब

जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा नियोजन समितीने घेतला असून देवगड शहरात भव्य पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात…

खरीप हंगाम 2026-27 साठी कुडाळ-मालवण सज्ज; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन कृषी विभाग खरीप हंगाम २०२६- २७ व मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणद रस्ते योजना कुडाळ व मालवण तालुकास्तरीय पूर्व तयारी व नियोजन बैठक पार पडली.या बैठकीला माजी आमदार श्री. राजन तेली, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत,…

🌟 केळूसचा गौरव! स. का. पाटील विद्यामंदिरचा एसएससीत 100% निकाल, ऐतिहासिक यश

स. का. पाटील विद्यामंदिर, केळूस एसएससी फेब्रुवारी–मार्च 2026 निकालात ऐतिहासिक यश! 🌟 शाळेचा 100% निकाल! 💯 गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक: प्रथम – कुमार धीरज सुरेश शेटये 👉 96.00% 💐 द्वितीय – कुमार साहिल रतन धुरी 👉 92.00% 💐 तृतीय –…

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा दणदणीत 100% निकाल; यशाची परंपरा कायम

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूलने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग यश संपादित करून 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत पुनः एकदा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. कु. कृतिका किरण पालव हिने…

कळसुलकर इंग्लिश स्कूलचा १००% निकालाचा दणदणीत यश

सावंतवाडी : कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल यावर्षी शंभर टक्के लागला असून प्रथम क्रमांक कु. मृणाली मधुकर देसाई ९७.२०%, द्वितीय क्रमांक कु. तेजस चंद्रोजी सावंत ९७.२०%, तृतीय क्रमांक कु. आर्या भार्गव…