कोकणशाही

कोकणशाही

एसटी आणि कारचा अपघातात शालेय विद्यार्थी जखमी….

कुडाळ : तालुक्यात पावशी केसरकरवाडी ग्रामीण रस्त्यावर एसटी आणि इको कारचा आज सकाळी अपघात झाला. यामध्ये काही शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.कुडाळ बामणादेवी कुडाळ शालेय फेरीची एसटी बस आणि इको कार यांच्यात आज सकाळी हा आघात झाला. यामध्ये इको कार…

नद्यांमधील गाळ हा कोकणासाठी संकटाचा विषय ;कर्ली नदीवरील गाळ काढला जाणार ; आ. निलेश राणे

कुडाळ नद्यांमधील गाळ हा कोकणासाठी फार संकटाचा विषय झाला आहे. त्यामुळे कुडाळ-मालवण मतदारसंघात कर्ली नदीवरील जे क्रिटिकल स्पॉट आहेत, तिथला गाळ काढला जाणार आहे. त्यासाठी “नाम” फाउंडेशन पुढे आले आहे. स्थानिक प्रशासन आणि “नाम” यांच्यात करार झाला आहे. या दोघांनीही…

पालिकेचा मोठा निर्णय ; एप्रिल पासून दर सोमवारी या भागात पाणीपुरवठा राहणार बंद…

रत्नागिरी उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून यावेळी ऐन उन्हाळ्यात रत्नागिरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी शहरात येतक्या एप्रिलपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. रत्नागिरी शहराला केला जाणारा पाणीपुरवठा २४ मार्चपासून दर सोमवारी देखभाल आणि…

आ.निलेश राणे कार्यकर्त्यां बद्दल बोलताना झाले भावूक ….

कुडाळ कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे कुडाळ मधील एका कार्यक्रमा दरम्यान कार्यकर्त्यां बद्दल बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. राणे कुटुंबासोबत काम केलेले हे कार्यकर्ते कोणे एके काळी कट्टर विरोधक बनले होते. मात्र त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

जिल्ह्यात ड्रग्ज विळखा ; ७ जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव,पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज विळखा वाढत असून, ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या प्रकरणातील सात जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस दलाला दिल्या असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

मुलींचे स्वागत म्हणून राबवला अनोखा उपक्रम…

कुडाळ सन २०२४- २५ या वर्षात झाराप येथे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत म्हणून ग्रामपंचायतीने नुकतेच वृक्ष व खेळणी वाटप केले. ग्रामपंचायतीच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे लेकीच्या नावाने झाराप गावात झाड लागणार आहे. झाराप ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या लेकीचे तिच्या…

लाकडी बांबूने वृद्धावर जीवघेणा हल्ला….

लाकडी बांबूने वृद्धावर जीवघेणा हल्ला करीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेत पोबारा केला. पुरुषोत्तम नरहरी प्रभूलकर (वय ८१, रा. नापणे धनगरवाडा) असे या वृद्धाचे नाव असून रेकी हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार सुरू आहेत.…

संपूर्ण राज्यात लवकरच धावणार ई-बाईक टॅक्सी….

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई हवेतील प्रदूषण कमी करण्यासह अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याचा हेतू समोर ठेवून राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परिवहन विभागाकडून त्याविषयीचा प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि त्यास मान्यता देण्यात आली. एक लाख…

तिहेरी अपघात ; ५ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी….

ब्युरो न्यूज कोकणशाही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. यात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये…

कॅब चालकशी मैत्री करणं पडलं महागात ; महिलेची पोलिसात धाव….

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही एका ४१ वर्षीय महिलेशी मैत्री करून वारंवार बलात्कार आणि १० लाखांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून एका ॲप-आधारित कॅब चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२३ पासून सुरू होता. त्रस्त झालेल्या महिलेने अखेर रविवारी वरळी पोलिसांकडे…