“गुरुप्रसाद संकुलात चोरट्यांचा कहर; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती”

कुडाळ शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गुरुप्रसाद सहकारी गृहनिर्माण संकुलातील पाच बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फ्लॅटच्या दरवाजांना चोरट्यांनी बाहेरून कडी लावून घेतली तसेच त्यांच्या दरवाजांवरील ‘आय कॅमेऱ्यावर स्टिकर चिकटविले. चोरट्यांच्या हाती काही फारसे लागले नाही. मात्र १२ हजार रु. चे सोन्याचे लॉकेट चोरीस गेल्याचे समजते. चोरटे चौघे असून त्यांनी आणलेली वेगनर कार व त्यांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.
चोरट्यांनी शहरात दिवसाढवळ्या चोरीचे ‘धाडस केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणाही हादरून गेली आहे. या चोरीचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही कुडाळात पोलिसांकडून चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली कार व त्यांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. मात्र कारची नंबर प्लेट बोगस असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.