कोकणशाही

कोकणशाही

श्रीवर्धन शहरात मोकाट गुरढोरांचा उपद्रव..

श्रीवर्धन शहरात मोकाट गुरढोरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्त्यावर बसलेले गुरढोर हे अचानक वाहनांच्या रस्त्यात येत असल्याने वाहनधारकांसाठी समस्या निर्माण होत आहे. यामुळे वाहन चालवणाऱ्यांना घाबरलेले आणि सावध होऊन मार्गक्रमण करावे लागते.रस्त्यावरून चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठीही हाच समस्या निर्माण होत…

फार्म कंपनी विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन ;खैरे येथील ६० जणांवर गुन्हा दाखल..

महाड एमआयडीसीतील सवाणे ग्रामपंचायत हद्दीतील खैरे गावाशेजारी सुदर्शन फार्मा कंपनीचे काम चालू आहे. मागील वर्षापासून कामाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे. एक वर्षानंतर पुन्हा शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तामध्ये कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवरच तीव्र आंदोलन छेडून काम बंद पाडले.…

दापोली शहरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी जखमी…

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी भाजून जखमी झाल्याची घटना दापोली शहरातील रूपनगर कॉम्प्लेक्स येथे शुक्रवारी दुपारी घडली. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. सुदैवाने त्यांची दोन मुले शाळेत गेल्याने ती या दुर्घटनेतून वाचली.अविनाश शिर्के (४०) आणि अश्विनी…

कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत..

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे , निवसर ते अडवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हि वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक गाड्या विविध ठिकाणी थांबून आहेत, कोकण रेल्वे महामार्गावर जे विद्युतीकरण झाले आहे, तेथे निवसर ते अडवली दरम्यान असलेली…

उबाठाचे कुर्ली ग्रा. पं. सदस्य योगेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश..

उबाठाचे कुर्ली ग्रा. पं. सदस्य योगेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला आहे, मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. उबाठाचे कुर्ली ग्रामपंचायत सदस्य योगेश आबासाहेब कदम व कार्यकर्ते कृष्णा दिनकर कदम, दत्ताराम विठोबा सावंत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी…

राजन साळवींनी सूर बदलला !

ठाकरे गटाचे उपनेते राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. या सगळ्या अफवा आहेत असेही म्हटलं होतं. त्यानंतर झालेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी, राजन साळवींवर अन्याय झाल्याची भूमिका मांडली आहे. असे सांगितल्याने…

आ.किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेशाचा धडाका सुरूच!

लांजा तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी आज राजापूर – लांजा – साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यामध्ये RDC चे संचालक मुन्ना खामकर, काँग्रेस माजी शहराध्यक्ष प्रसन्न शेट्ये, उबठाचे महीला शहर संघटीका छायाताई गांगण, वि.…

गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा..

सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा.…

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा नागरी सत्कार…

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा नागरी सत्कार शनिवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ येथील भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. सत्काराची जय्यत तयारी पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे. या सत्कार सोहळ्याला…

ओरोस येथे अपघातात व्हॅगनारची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचारा दरम्यान निधन..

सिंधुदुर्ग ओरोस येथे झालेल्या अपघातात व्हॅगनारची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालय परिसरातील वळणावर घडली होती. श्रीकृष्ण सावंत असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर गोवा- बांबुळी येथे…