कोकणशाही

कोकणशाही

बंद अवस्थेत असलेल्या रुग्णालयातील मशिनस् साठी आ.दीपक केसरकरांकडून निधी मंजूर…

सावंतवाडी प्रतिनिधी २८ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात बंद पडलेल्या डायलिसिस मशीन व आर ओ प्लांट साठी १५ लाखाचा निधी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मंजूर केला आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी पाठपुरावा केला होता. याबाबतची माहिती…

जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध धरणे आंदोलन ; पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेऊन केली चर्चा…

सिंगधुदुर्ग प्रतिनिधी २८ आपल्या विविध मागण्या व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी प्रजासत्ताकदिनी जि. प. भवन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे 25 उपोषणे झाली. प्राजासत्ताक दिनाचे ध्वज फडकल्यानंतर पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच संबधित खातेप्रमुखांनी…

शिवसेना कुडाळ च्या वतीने स्वर्गिय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जयंती साजरी …

नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा शिवसेना कुडाळ च्या वतीने शाखा कार्यालय येथे स्वागत-सत्कार आज दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कुडाळ येथे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक , कार्यकर्ते यांच्या वतीने कुडाळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्वर्गिय दिघे साहेबांची…

एस टी कर्मचा-याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ नेहमीच कार्यरत

कुडाळ प्रतिनिधी एस टी कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ नेहमीच कार्यरत असणार असे प्रतिपादन रस्ता व वाहतूक सुरक्षा सप्ताहनिमित्त कुडाळ आगार वाहक, चालक व कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर रोटरी क्लब ऑफ कुडाळ,सुयश हाॅस्पिटल कुडाळ व…

हुंडा प्रतिबंध कायद्यातील सुधारणा होण्यासाठी न्यायलयाने जनहित याचिका फेटाळली…

🖋️कोकणशाही ब्युरो न्यूज “समाज बदलला पाहिजे, आपण काहीही करू शकत नाही,” असे निरीक्षण नोंदवत आज २७ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने हुंडा प्रतिबंधक कायद्यात ‘सुधारणा’ करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नियुक्त करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका फेटाळला आहे, हुंडा आणि घरगुती…

हॉस्पिटल ऑन व्हील सुरू करणार ; मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन…

🖋️कोकणशाही ब्युरो न्यूज रत्नागिरी : दि, २७ घराघरात आरोग्याची सुविधा पोहचविण्यासाठी ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ ही संकल्पना रत्नागिरीत सुरू होणार आहे, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.येथील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (पीएम अभीम) क्रिटिकल केअर…

पालक मंत्री नितेश राणे यांच्या आश्वासनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे…

वेंगुर्ले आगारातील वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांचा मनमानी कारभार वेळोवेळी आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून सुध्दा त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या आगार कार्यकारणीने रविवारी (दि.२६) उपोषण छेडले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष…

सिंधुदुर्गनगरीने घेतला मोकळा श्वास ! पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा आदर्शवत दरबार

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग : लोकप्रतिनिधी कसा असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे आहेत. पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्यावर एवढा गुलाल उधळण्याची कारणही तितकेच लक्षवेधी आहे. आढावा बैठकांमध्ये बोलताना ‘माझ्या जिल्ह्याचे नाव कुठल्याही गीष्टीमुळे खराब…

76वा प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्करी सामर्थ्याबरोबर सांस्कृतिक विविधतेची झलक !

कोकणशाही ब्युरो न्यूज: दि.२६ आज भारत आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसह राज्य समारंभात सहभागी होण्यासाठी कर्तव्य मार्गावर आल्या आणि त्यांनी तिरंगा फडकावला. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून…

सिंधुदुर्गात अवैध धंदे नकोच यासाठी जिल्हा पोलिस दलाने कडक भूमिका घ्यावी; पालक मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग : दि :२६ सिंधुदुर्गात कोणतेही अवैध धंदे असणार नाहीत याची काळजी घ्या. हा जिल्हा ड्रग मुक्त व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने आपली ताकद वापरावी. बेकायदा दारु, मटका व जुगार बंदच झाले पाहिजेत. अनैतिक धंदे या जिल्ह्यात नकोच यासाठी जिल्हा पोलिस…