महाकुंभात पत्नी हरवल्याचा बनाव ; लॉजमध्ये नेऊन केली हत्या…

प्रयागराज

पत्नीसोबत महाकुंभास आला होता. त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर त्याने फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी तो घरी एकटाच परतला. मुलांना
आणि घरातील अन्य जणांना त्याने महाकुंभातील गर्दीत पत्नी हरविल्याचे सांगितले. त्यानंतर मुलगा आईला शोधण्यासाठी प्रयागराजला पोहोचला. साधू-महंतांसह प्रशासनाकडे त्याने गर्दीत हरवलेल्या आईबाबत विचारणा केली. पोलिसांमध्येही फिर्याद दिली. आरोपी अशोक यानेच पत्नी मीनाक्षीची हत्या केल्याचे तपासातून पुढे आले आहे. आरोपीचे अन्य एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होता. महाकुंभात स्नान केल्यानंतर तो पत्नीला घेऊन लॉजला गेला होता. लॉजमध्ये रात्री पत्नी झोपल्यावर गळा चिरून हत्या केली.