कोकणशाही

कोकणशाही

जिल्ह्याचा ५ कोटी ७९ लाख रुपयांचा टंचाई आराखडा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी १२ गावे व ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक…

राज्यातील सर्वात नावाजलेल्या ठिकाणी भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न…

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबईतील गजबजलेला परिसर असलेल्या धारावीमध्ये स्फोटाची मोठी घटना घडली आहे. धारावीत गॅस सिलेंडरने भरलेल्या गाडीचा स्फोट झाला आहे. ही गाडी खरंतर रस्त्याच्या बाजूला उभी होती. या उभ्या असलेल्या गाडीला आग लागली त्यानंतर काही स्फोट झाले.स्थानिकांकडून मिळालेल्या…

कुणाल कामराचा कुडाळ युवासेनेकडून निषेध; पोलिसांना दिले निषेधाचे निवेदन

कुडाळ: प्रतिनिधीस्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातील राजकारण यांची कवितेद्वारे खिल्ली उडविली. या वक्तव्याचा कुडाळ तालुका युवासेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला. या वक्तव्याबद्दल कुणाल याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी, तसे…

घरफोडी ; साडेचार लाखांचे दागिने लंपास चोरटा सीसीटीव्हीत कैद….

सावंतवाडी : आरोंदा – सावरजुवा येथील गीता हनुमंत गावडे यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घुसून तब्बल साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…

प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक….

ब्युरो न्यूज कोकणशाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप राज्य शासनाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच प्रशांत कोरटकर याला महाराष्ट्रात…

‘ उमेद’ च्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगळी क्रांती घडवण्याचा प्रयत्न सुरू; ना.योगेश कदम

मंडणगड : उमेद अभियान सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बचत गटांना दिशा मिळाली. उमेदच्या माध्यमातून हळूहळू महिला व्यवसायामध्ये उतरायला लागल्या आहेत. ग्रामविकास खात्याअंतर्गत येत असलेल्या उमेद च्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगळी क्रांती घडवण्याचा आपला प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन गृहराज्य मंत्री योगेश कदम…

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, महायुती सरकारचा प्रयत्न; मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे …

कणकवली, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे, अशी घोषणा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली. तलावाचा गाळ काढणे आणि तलावांवरील अतिक्रमण हटविणे यालाही प्राधान्य दिले जात आहे, असे राणे म्हणाले.प्रश्नोत्तराच्या तासावर विधान परिषदेत…

काजू बागेला आग; काजू बाग जळून बेचिराख, मोठे नुकसान

कुडाळ वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब येथील रहिवासी मीना दिगंबर ठाकुर यांच्या घर परिसरातील काजू बागेला रविवारी दुपारी १ वा. च्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले. ठाकुर यांच्या घरातही या आगीच्या ज्वाला घुसून कपडे जळून खाक झाले. सुदैवाने स्थानिक…

कोकणात लवकरच उभारणार ‘मालवणी भाषा भवन’….

सावंतवाडी  :  कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. त्यामुळेच पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्य व साहित्यिक यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. कोकणातील या…