कोकणशाही

कोकणशाही

सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन असणाऱ्या लालपरीचा प्रवास ठरणार महाग…

सर्वसामान्यप्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार असल्याचीही माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास महागणार…

वैभववाडीतील नगरसेविका यांचा भाजप मध्ये प्रवेश…

वैभववाडी येथील नगरसेविका सानिका रावराणे, वाभवे यांच्यासह सोसायटीचे चेअरमन संतोष मांजरेकर आणि सुनील रामचंद्र रावराणे यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे.त्यांचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले. या वेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर, दिलीप रावराणे,…

एमआयटीएम कॉलेज मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह !

जयवंती बाबू फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यक्रम सिंधुदुर्ग यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह २०२५ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अधिकारी केतन पाटील पाहुणे म्हणून उपस्थित होत. यावेळी एमआयटीएमच्या…

नद्या गाळमुक्त करण्यासाठी हाती घेणार विशेष मोहीम; पालकमंत्री नितेश राणे

पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर परिणामकारक उपाय म्हणजे नद्यांमधील गाळ काढून नद्या गाळमुक्त करणे. पहिल्या टप्प्यात ४ ठिकाण निश्चित…

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीने होणार साजरा..

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर ही प्रशाला एका अनोख्या पद्धतीने साजरा करणार असल्याची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी दिली. या अनोखा ध्वजारोहण सोहळा रविवार दि .२६ जानेवारीला संस्थाध्यक्ष…

पालकमंत्री नितेश राणे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन..

सावंतवाडी : दि,२४ महाराष्ट्र राज्याचे मत्सव्यवसाय व बंदर विभाग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री नितेश राणे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच काम श्री. राणे करतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी…

कोकणात पुन्हा एकदा महायुतीचीच बाजी; नगराध्यक्षपदी महायुतीचाच शिलेदार

सिंधुदुर्ग : दि.२४ कोकणात पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार निलेश राणेंनी महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फोडत महाविकास आघाडीच्या माजी आमदार वैभव यांना मोठा झटका दिला आहे. या विजयानंतर महायुतीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.कुडाळमध्ये…

पालकमंत्री नितेश राणे यांचे झटपट निर्णय व तात्काळ अंमलबजावणी…

सिंधुदुर्ग : दि.२४ सिंधुदुर्गातील पूर परिस्थिती रोखण्यासाठी व जनतेला दिलासा देण्यासाठी संभाव्य ठिकाणे निश्चित करण्यासाठी चार दिवसापूर्वी बैठक झाली, पुन्हा आज शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. व ही ठिकाणे निश्चित करून १ फेब्रुवारीपासून ही गाळ उसपण्याची कामे सुरू करण्याचे आदेशही झाले.…

दशातवारात “डिजिटलायझेशन” आणून तो जगाच्या प्लॅटफॉर्मवर दाखविण्यासाठी प्रयत्न ; आशिष शेलार

सावंतवाडी, दि.२४: दशातवारात “डिजिटलायझेशन” आणून तो जगाच्या प्लॅटफॉर्मवर दाखविण्यासाठी प्रयत्न करुया. त्यासाठी महाराष्ट्र शासन तुमच्याशी पार्टनरशीप करायला तयार आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेवून अन्य लोककलांच्या शर्यतीत दशावताराला पहिले स्थान देवूया, असे अभिवचन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी येथे दिले.…

भरदिवसा सावंतवाडीत चाकू हल्ला…

सावंतवाडी, दि.२४: किरकोळ कारणातून सावंतवाडीत चाकू हल्ला झाला आहे. यात एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज मॅगो १ हॉटेल परिसरात सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान दोन्ही युवकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी प्रक्रिया सुरू आहे.