विजयदुर्ग / देवगड :
इतिहासाची साक्ष देणारी ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. भारतीय नौदलाची ‘आयएनएस गुलदार’ ही केवळ युद्धनौका नसून सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे. यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आहे.
विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम व सदस्य यांनी याबाबत लक्ष वेधले होते. या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते.
सध्या कारवार येथील नौदल तळावर नांगरलेली युद्धनौका आयएनएस गुलदार. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी याबाबत ई- निविदा सूचना प्रसिध्द केली आहे. भारतीय नौदलाचे निवृत्त ‘आय. एन. एस. गुलद’ हे जहाज सध्या कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावर नांगरलेले आहे. ते जहाज विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी संस्थेची मणूक करण्यात येणार असून यासाठी ही निविदा काढण्यात आली आहे.
हे जहाज ८१ मीटर लांब आणि १२०० टन विस्थापन असलेली ३० मिमी. क्लोज रेंज गन आणि रॉकेट लाँचर्सने सुसज्ज आहे. ३० डिसेंबर १९८५ साली ही युध्दनौका नौदलात समावेश करण्यात आली. युध्द सज्जते व्यतिरिक्त हे जहाज नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य, अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि आपत्कालीन साहित्य वितरणासाठीही वापरली जायची.
विजयदुर्ग खाडी सुमारे ४२ किलोमीटर लांबीची असून ४० ते ५० मीटर खोल आहे. नागमोडी वळण, खाडीच्या
दुतर्फा डोंगर असलेली ही सुरक्षित खाडी वादळी परिस्थितीतही नौकांना उपयुक्त आहे.
विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परूळेकर यांच्या संकल्पनेतून विजयदुर्ग येथे २००५ मध्ये ‘अष्टशताब्दी महोत्सव’ साजरा करण्यात आला होता. त्यानंतर विजयदुर्ग येथे पर्यटनला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. विजयदुर्ग येथे किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी विजयदुर्ग येथे येतात. आता या पर्यटकांना किल्ल्याबरोबरच ही युद्ध नौका पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.









