
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध मच्छिमार संस्था, सहकारी सोसायट्या आणि मच्छिमार प्रतिनिधींशी आज कणकवली येथे मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर चर्चा केली. डिझेल दरवाढीमुळे मच्छिमार बांधवांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी तसेच पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांसाठी मासेमारी बंदीचा एकसमान कालावधी निश्चित करण्याची मागणी यावेळी प्रतिनिधींनी मांडली.
मत्स्यव्यवसाय हा कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे आमचे प्राधान्य आहे. दरम्यान, मच्छिमार बांधवांच्या न्याय्य मागण्यांबाबत मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करून मच्छिमार बांधवांना योग्य तो न्याय मिळवून देऊ असे, आश्वासन यावेळी दिले.
बैठकीस रविकिरण तोरस्कर, बाळा खडपे, बुवा तेंडुलकर, विकी चोपडेकर, कृष्णनाथ तांडेल, कांता कोइंडे, काका प्रभू, गौरव पारकर, बापू जुवाटकर, ज्ञानेश्वर खवळे, अक्षय हरम, उल्हास मंचेकर, सचिन आरेकर, उमेश आंबेरकर यांच्यासह विविध मच्छिमार संस्था, सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












