कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सांगिर्डेवाडी येथील बजाज शोरूमच्या मागील मोकळ्या जागेत वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत उद्यान विकसित विकासकामाचा भूमिपूजन सोहळा तसेच नगरोथ्यान निधीमधून मंजूर झालेला हायमास्ट लाईटचे लोकार्पण कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेश राणे यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, भाजपा ज्येष्ठ नेते राजू राऊळ, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा उपाध्यक्ष बंड्या सावंत, जिल्हा उपाध्यक्षा सौ.संध्या तेरसे, तालुका उपाध्यक्ष विजय कांबळी, माजी नगराध्यक्ष विनायक राणे,शहराध्यक्ष सुनील बांदेकर, महिला शहराध्यक्षा सौ. मुक्ती परब, महिला शहर उपाध्यक्षा सौ.विशाखा कुलकर्णी, नगरसेवक निलेश परब, मुख्याधिकारी श्री. विनायक औंधकर, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा , उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक सचिन काळप, राजू गवंडे भाजपा पदाधिकारी – कार्यकर्ते व मोठ्या संख्येने सांगिर्डेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते












