लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक ! आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सावंतवाडी : मैत्रीच्या संबंधातून लग्नाचे आमिष दाखवून नंतर लग्न करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार अभिजीत विजय कांबळी (३०, रा. साटेली-मधलीवाडी) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे.
दाखल तक्रारीनुसार, गेल्या सात-आठ वर्षांपासून अभिजीत याने तक्रारदार युवतीशी मैत्रीचे संबंध ठेवून लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली. त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे सदर प्रकरण सावंतवाडी पोलीस ठाण्यापर्यंत आले. यापूर्वी मुलगा व मुलीकडील नातेवाईकांनी दोघांमध्येही समझोता करण्याचा प्रयत्न केला. पण युवकाने आपण या मुलीशी आता लग्न करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे आपल्याला फसवून, लग्नाचे आमिष दाखवून आपली मानसिक छळवणूक केल्याची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.