न्हावा-शेवा-शिवडी प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयातील माझ्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली.
न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या अडचणी, नुकसानभरपाई, पुनर्वसन, मासेमारी व्यवसायावर झालेला परिणाम तसेच भविष्यातील उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांचे हित अबाधित ठेवून त्यांच्या सर्व प्रश्नांवर न्याय्य तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून मच्छीमारांच्या हितासाठी सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचा विश्वास यावेळी मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला.
बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. घोडे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे, तसेच स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.