नढाळ पंचायतन मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा

नढाळ,खालापूर-पनवेल येथील पंचायतन मंदिराचा चौथा वर्धापन दिन सोहळा नुकताच उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून पंचायतन मंदिरात दर्शन घेतले.


पंचायतन मंदिराच्या माध्यमातून नढाळ परिसरात आध्यात्मिक चेतना जागृत झाली आहे. या भव्य मंदिराचे निर्माण करणाऱ्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचा समाजसेवेचा आदर्श कौतुकास्पद आहे. जे.एम.म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वात ही ट्रस्ट केवळ धार्मिक कार्यापुरता मर्यादित न राहता, जनसेवेचे एक मोठे व्यासपीठ बनले आहे. पंचायतन मंदिर आणि ट्रस्टचा लोकसेवेचा आणि धर्मकार्याचा वसा असाच पुढे चालत राहो, यासाठी मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणे नेहमीच सहकार्य राहील अशी भावना याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित सर्वांना मंदिराच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.