पनवेलच्या आखाड्यात मल्लांची गर्जना; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते कुस्त्यांचा शुभारंभ

भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल आयोजित “श्री.परेश ठाकूर केसरी पनवेल २०२६” या भव्य जंगी कुस्ती स्पर्धेला मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती. पारंपरिक जल्लोष, मल्लांच्या गर्जना आणि कुस्ती शौकीनांच्या उत्साहपूर्ण वातावरणात आखाड्यात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते कुस्ती लावण्याचा सन्मान लाभला. यावेळी श्री.परेश ठाकूर यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना यशस्वी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर, आमदार श्री.प्रशांत ठाकूर, आमदार श्री.निरंजन डावखरे, ज्येष्ठ नेते श्री.जे. एम. म्हात्रे, नगरसेवक हॅपी सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.