करिअरची सुवर्णसंधी! एम आय टी एमचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ल्यात सुरू

एम आय टी एम अभियांत्रिकी कॉलेजचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ला येथे सुरू
दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या सिंधुदुर्ग नगरीला लागून असलेल्या जयवंती बाबू फाउंडेशनच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी कॉलेज मधून पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ला येथे सुरू करण्यात आले आहे.

१ वेंगुर्ला केंद्र पत्ता :
2579, कुबल आर्केड, उभादांडा, वेंगुर्ला-शिरोडा रोड, मानसीश्वर पेट्रोल पंपाच्या जवळ, वेंगुर्ला पिन-416516

१ कुडाळ केंद्र :
एमआयटीएम कुडाळ कार्यालय आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन रोडजवळ, माळगावकर हाऊस, ता. कुडाळ

मालवण केंद्र :
म्हाडा कॉलनी आमंत्रण हॉटेल नजिक पॉलिटेक्निक रोड, मालवण


ही सर्व केंद्रे सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत सुरू राहणार असून वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा, शिरोडा, रेडी, आरोंदा, आजगाव तसेच दोडामार्ग, बांदा, ओटवणे या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एम. आय. टी. एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी केले आहे.
तसेच वेंगुर्ला केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी मानसीश्वर पेट्रोल पंपाचे मालक व उद्योजक श्री. विलास कुबल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या संस्थेबद्दलच्या सहकार्याबद्दल व पाठिंब्याबद्दल एम. आय. टी. एम. संस्थेतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

अधिक माहितीसाठी संपर्क :
9657258996
9405330277
8390979536