प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत “धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA)” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांचा आढावा तसेच विविध घटकांसाठी निधी वाटपाबाबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली.
बैठकीत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान(DAJGUA )योजनेअंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन आणि लाभार्थी सहभागातून राबविण्यात येणाऱ्या विविध मत्स्य प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसेच PMMSY अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला.
आदिवासी समाजातील युवकांना मत्स्यव्यवसायाशी जोडून त्यांना स्वावलंबी करणे हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.
मत्स्यव्यवसाय हा केवळ पूरक व्यवसाय नसून ग्रामीण व आदिवासी अर्थव्यवस्थेला बळ देणारा महत्त्वाचा उद्योग आहे. DAJGUA योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागात बायोफ्लॉक, फिश केज कल्चर, फिश व्हेंडिंग सेंटर, थंड साखळी सुविधा यांसारखे आधुनिक प्रकल्प उभारून रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचे तसेच पात्र आदिवासी युवकांना योजनांचा त्वरित लाभ देण्याचे निर्देश देऊन केंद्र शासनाच्या PMMSY आणि DAJGUA योजनांमधील शिल्लक अर्जदारांना “प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना” अंतर्गत लाभ देण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.












