रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी मच्छीमार जेट्टी संदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली . रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी हे मासळी उतरवण्याच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. बुरोंडी येथील मच्छीमारांच्या विविध समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या असून मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम करणे यासाठी शासन कटिबद्ध आहे. असे “Fisheries and Aquaculture Infrastructure Development Fund (FIDF)” या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत हर्णे मत्स्य बंदर विकासाचे काम सुरू असून, त्याच धर्तीवर बुरोंडी येथेही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या जेट्टी प्रकल्पामुळे वाहतूक खर्च कमी होईल, मासळीचा दर्जा टिकून राहील आणि स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल. तसेच दापोली तालुक्यातील मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीस माजी आमदार सूर्यकांत दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, केदार साठे, शिवानी गावकर यांसह स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.












