Category बातम्या

मोटरसायकल वरचा ताबा सुटल्याने अपघात युवक ठार…

कणकवली : कसाल ते कणकवली असा प्रवास करताना ताबा सुटल्याने मोटरसायकल थेट दुकानात घुसली. या अपघातात कुडाळ – गावराई भोगलेवाडी येथील चिंतामणी रवींद्र मेस्त्री (२६) हा युवक ठार झाला. हा अपघात बुधवारी रात्री ११.४५ वा. च्या सुमारास झाला. अपघाताची खबर…

साखरेचे भाव गगनाला….

नवी दिल्ली वृत्तसंस्था मागील एका महिन्यात भारतातील साखरेच्या किंमतीत ६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खराब हवामान आणि साखर निर्यातीमुळे साखरेचा तुटवडा निर्माण झाला असून साखरेच्या किंमतीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. साखर हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असल्याने येणाऱ्या काही…

बस, रेल्वे स्टेशनवर दागिने चोरणारा जेरबंद

कणकवली पोलिस व एलसीबी सिंधुदुर्ग यांची धडाकेबाज कारवाई कणकवली : एसटी बसस्थानक तसेच रेल्वेस्टेशनवर गाडीमध्ये चढणाऱ्या वयोवृद्ध महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या गर्दीचा फायदा घेवून चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्हयाचा कणकवली पोलिस व एलसीबी सिंधुदुर्ग यांच्याकडून समांतर तपास सुरु…

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पक्षाच्या वतीने संघटन सदस्य नोंदणी

आज सोमवार दिनांक १७फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी यांची बैठक जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली प्रमुख उपस्थितीत भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी साहेब व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मुश्ताक दळवी…

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार दंड. काय आहे नेमकं प्रकरण ?

नाशिक महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारा निर्णय समोर आला आहे. अजित पवार गटाती महत्त्वाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आ ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. १९९५ मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि…

७४ वर्षीय वृद्ध इसमाचा पाण्यात बुडून मृत्यु…

महाड : तालुक्यातील कोकरेतर्फे गोवेल सावित्री खाडीच्या जेटीजवळ ७४ वर्षीय वृद्ध इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.आत्माराम दाजी आंबेकर असे बुडून मयत झालेल्या इसमाचे नाव असून आंबेकर हे १८ फेब्रुवारी रोजी घरातून अकरा वाजता बाहेर पडले. यानंतर त्यांचा मृतदेह सायंकाळी…

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आज जिल्हा दौरा…

गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम मागील वर्षापासून वेगाने सुरू झाले आहे. या महामार्गाच्या पाहणी आणि अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गुरुवार, दि. २० रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी दुपारी ३.३० वाजल्यापासून ते…

‘छावा’ चित्रपटाला घेऊन आ.किरण सामंत यांची मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय मागणी? येथे वाचा सविस्तर…

रत्नागिरी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शंभूराजेंच्या बलिदानाची महती विद्यार्थ्यांना कळावी यासाठी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीमध्ये दाखवण्यात यावा, अशी मागणी राजापूर-लांजाचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनापत्राद्वारे केली आहे.गुरुवारी…

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार

मुंबई, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते होणार आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची…

सिंधु संजीवन संस्था संचालित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक प्रथम वर्धापन दिन सोहळा…

सिंधु संजीवन संस्था संचालित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक, देवगड चा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. महिलांमध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी वर्धापन दिनाच्या निमित्ताने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पथकाच्या विशेष…