Category बातम्या

कोकणातील प्रवाशांसाठी खूशखबर; वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ

रत्नागिरी : कोकणात प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशातील सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला…

चक्रीवादळ सक्रिय ! पुढील २४ तासांत विजांसह गडगडाटी होण्याची शक्यता

मान्सून भारतात परतला असला तरी हवामानाचा प्रकोप अजून संपलेला नाही. हा आठवडा अनेक राज्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे, ज्यामुळे किनारी भाग तसेच अंतर्गत राज्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रभावित भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता…

एसटीच्या धडकेत युवतीचा भीषण अपघात

सिंधुदुर्ग : तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीच्या सणाच्या दिवशी एक दुर्घटना घडली. फोंडाघाट गांगोवाडी येथील निकिता दिलीप सावंत या युवतीचा भीषण अपघातात मृत्यू झाला असून, तिच्या जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.लग्न ठरलेलं, घरात सुरू होती तयारी निकिता हिचं लग्न येत्या…

दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडचा हापूस आंबा वाशी मार्केटला रवाना

जगभरातील प्रसिद्ध हापूस आंब्याची पहिली पेटी देवगड येथून रवाना झालीं आहे. देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ६ डझन हापूस आंब्यांची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना केली. यावर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ…

ऐन दिवाळीत सातोसे, मडुरा गावातील वीज पुरवठा गायब

बांदा : वीज महावितरणच्या हलगर्जी कारभाराचा फटका सातोसे, मडुरा गावातील वीज ग्राहकांना बसला असून ग्रामस्थांवर काळोखात दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून दोन दिवस वीज गायब असल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. याबाबत सोशल मीडियातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत…

कुडाळ शहरात मुंबई गोवा हायवेलगत असलेल्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग

कुडाळ शहरात मुंबई गोवा हायवेलगत असलेल्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द कुडाळ : कुडाळ शहरातील श्रीरामवाडी येथे मुंबई गोवा महामार्गलगत काल रात्री सुमारे 10:30 ते 11 च्या दरम्यान निकम यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेला आगीमुळे…

पिंगुळी जि. प. मध्ये साईराज उर्फ साई दळवी यांच्या नावाला युवा वर्गाची जोरदार पसंती

आ. निलेश राणे यांचे विश्वासू निकटवर्तीय व जनतेच्या सुख दुःखात धावून जाणारा चेहरा म्हणून साईराज दळवी यांची ओळख साईनाथ गांवकर | कोकणशाही पिंगुळी जिल्हा परिषद मतदार संघामधील खुल्या आरक्षण मुळे पिंगुळी गावातील युवा नेतृत्व व युवा सेना कुडाळ तालुका सचिव…

पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते ‘मेक इन कोकण’ रोजगार महोत्सव २०२५’ चे उत्साहात उ‌द्घाटन

सावंतवाडी : भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मेक ईन कोकण’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला चालना देण्यासाठी ‘उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५’ चे उत्साहात उ‌द्घाटन करण्यात आले. पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ झाला. या महोत्सवामध्ये…

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्यानंतर कुडाळ आगारात भेटणार आनंदाची बातमी

कुडाळ : कुडाळ बस आगारासाठी आणखीन ३ नवीन एस.टी. गाड्या उपलब्ध झाल्या असून, या गाड्यांचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. कुडाळ आगाराला नवीन गाड्या मिळाव्यात यासाठी आमदार राणे यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. अता पुन्हा नव्याने…

ठाकरे कुटुबांवर स्थानिक नागरिक नाराज ; थेट पोलीस ठाण्यात, म्हणाले कारवाई करा; काय प्रकरण ?

मुंबई : शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेनं आयोजित केलेल्या ‘दीपोत्सवा’च्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीयांच्या मनोमिलनाचा सोहळाच शुक्रवारी पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ‘दीपोत्सवा’चं उद्घाटन झालं. परंतु आता या सोहळ्यावरून नवीन वाद निर्माण झाला. या कार्यक्रमादरम्यान फटाके फोडल्यामुळे…