
“कोकणचा अभिमान! सहावीच्या पाठ्यपुस्तकात मालवणी भाषेला मानाचे स्थान”
कणकवली : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नव्या पाठ्यपुस्तकांमध्येही राज्यातील बोलीभाषांना स्थान दिले आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांत मालवणी, वन्हाडी या बोलीभाषांचा समावेश असून, अकरावी-बारावीच्या स्तरावरही पाठ्यपुस्तकातील बोलीभाषांचा विस्तार करण्याचे ‘बालभारती’च्या विचाराधीन आहे.…








