Category बातम्या

अंगारकी संकष्टीला गणपतीपुळे फुलले; 70 हजार भाविक, 80 लाखांची उलाढाल

रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंगळवारीभाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. पहाटे साडेतीनपासूनच भक्तांचा महासागर लोटला आहे. काल दिवसभरात सुमारे ७० हजार भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतल्याचा अंदाज असून, या माध्यमातून परिसरात सुमारे ८० लाखांची आर्थिक उलाढाल…

NCMC कार्ड घोटाळा थांबवण्यासाठी एसटीची कडक भूमिका

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डच्या विक्रीत गैरप्रकार करणाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जर एखाद्या अधिकृत विक्रेत्याने प्रवाशांकडून कार्डसाठी जादा दर आकारला, तर…

कुडाळात १० मे रोजी राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलनाची धूम

कुडाळ : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (NEPHDO) यांच्यावतीने ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६ रविवार, १० मे रोजी कुडाळ येथे आयोजित केले आहे.या संमेलनास, राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील पर्यावरणप्रेमी सहभागी होणार आहेत. कुडाळ उद्यमनगर येथील जय…

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत स्कायला अॅक्वेरियम प्रकल्पाला गती

मंत्री मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्तिथीत पनवेल मत्स्य उपकेंद्रात ‘स्कायला अॅक्वेरियम प्रकल्पबाबत मंत्रालयात बैठक पार पडली. पनवेल येथे प्रस्तावित ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा उभारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे,…

सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

ग्रामस्थ कोटकामते, ग्रामपंचायत कोटकामते, शाळा व्यवस्थापन समिती तसेच आजी-माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. केंद्रशाळा कोटकामते नं. १ येथील आदरणीय केंद्रमुख्याध्यापक मा. श्री. मनोहर मुणगेकर सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा दि. २ मे २०२६ रोजी सायं. ४.००…

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले

६ व ७ मे रोजी होणार पुरा येथे शिबिर कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी उद्या ६ मे व ७ मे रोजी महायुती कार्यालय येथे मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी…

सिंधुदुर्गात इंधन टंचाई? अफवांना बळी पडू नका – प्रशासनाचा इशारा!

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे आगमन होत असल्याने काही काळ इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांशी समन्वय साधून पुरवठा…

स्व-गणना अभियान: शंभर टक्के यशासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या स्व-गणना मोहिमेला गती देत ती शंभर टक्के पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. १ मे २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी…

चार महिन्यांच्या अडथळ्यानंतर शिक्षकांच्या पगाराला हिरवा कंदील । Kokanshahi ।

मुंबई : संच मान्यता शालार्थ ला जोडल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालयांची पदे मिस मॅच होत होती. या कारणास्तव गेले चार ते पाच महिने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाना वेतन करताना असंख्य अडचणी येत होत्या.पगार बिल फॉरवर्ड केल्यावर ते वेतन अधीक्षक लॉगिन ला न…

आंबा–काजू बागायतदारांसाठी दिलासा; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश!

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात यंदा कडाक्याची थंडी आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू या प्रमुख फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी…