
सकल हिंदू समाज शिरोडा मंडळ आयोजित ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक सोहळा अर्थात हिंदू साम्राज्य दिन शुक्रवार २८ जून २०२६ रोजी सायंकाळी साळगावकर मंगल कार्यालय आरवली येथे पार पडला. यानिमित्त घेण्यात आलेल्या रंगभरण उपक्रमात ६४ मुला मुलींनी भाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.प्रकाश रेगे, प्रमुख पाहुणे श्री अरविंद कुडतरकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्री.मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते कार्यक्रमात शिवराज्याभिषेक देखावा सादर करण्यात आला श्री रवी पणशीकर यांनी उत्तम वेशभूषा करून संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत महाराजांच्या भूमिकेत सिंहासनावर बसून राहिले हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सांघिक पद्य अमृत वचन व्यक्तिगत गीत झाल्यानंतर प्रमुख वक्त्यांनी उत्तम असे मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन उमर्यें गुरुजी यांनी केले. कुमारी पणशीकर हिने पसायदान म्हटले कार्यक्रमाचे सूत्र संचालन,प्रास्ताविक श्री जयवंत राय यांनी केले रंगभरण उपक्रमात सहभागी मुला मुलींना महाराजांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटण्यात आली. चहापान आणि अल्पोपहारा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. समाजातील सर्व स्तरावरून या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे असे कार्यक्रम वारंवार व्हावेत अशी मते बऱ्याच जणांनी बोलून दाखवली. कार्यक्रमासाठी 170 लोक उपस्थित होते.












