मुंबई : लाला लजपतराय मेमोरियल ट्रस्ट ताडदेव, मुंबई येथे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवडी, भायखळा, वरळी, मुबादेवी, मलबार हिल तसेच कुलाबा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेतील BLA पदाधिकारी यांची SIR (Special Intensive Revision) संदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन बैठक आमदार निलेश राणेंच्या उपस्थित उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
यावेळी SIR मोहिमेचे प्रभावी नियोजन, बूथस्तरीय जबाबदाऱ्या, मतदार पडताळणी प्रक्रिया आणि आगामी संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी SIR मार्गदर्शक श्री. दिग्विजयजी पाटील,शिवसेना उपनेते श्री. सुनीजी नरसले, माजी आमदार तथा नगरसेविका सौ. यामिनी जाधव, लोकसभा समन्वयक श्री. प्रमोद मांजरेकर, दक्षिण मुंबई विभाग संघटक श्री. विजय वाडकर, नगरसेविका सौ. वनिता नरवणकर, वरळी विभागप्रमुख श्री. दत्ता नरवणकर, मुंबादेवी विभागप्रमुख श्री. रुपेश पाटील, शिवडी विभागप्रमुख श्री. शशी निकम, भायखळा विभागप्रमुख श्री. विजय लिपारे, श्री. नाना आंबोले, तसेच सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












