

पालघर : चिंचणी, पालघर येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी पाहणी करून, या परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
वाढवण बंदर हा महाराष्ट्राच्या सागरी विकासाला नवी दिशा देणारा आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यादृष्टीने आवश्यक नियोजन व विकासकामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
यावेळी वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री श्री. गणेशजी नाईक, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.












