Category बातम्या

राज्यात बर्ड फ्लूचा कहर! 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी नष्ट

मुंबई : नंदुरबारच्या नवापूर येथे पसरलेला बर्ड फ्लूमुळे आत्तापर्यंत १२ पोल्ट्री फार्ममधील पक्षी मारण्याची वेळ आली असून ३.८९ लाख कोंबड्या तसेच, २१ लाख अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. काही कोंबड्यांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले होते. तेव्हापासून…

सिंधुदुर्गात वादळी पावसाचे थैमान; पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत तातडीची आढावा बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांचे तसेच वीज यंत्रणेचे झालेल्या नुकसानी संदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. यावेळी प्रत्येक तालुकानिहाय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने आणि सर्वोतोपरी मदत…

कोकण रेल्वे प्रकल्पबाधितांना न्याय मिळणार? रोजगारासाठी पालकमंत्री नितेश राणेंची ठोस भूमिका

कोकण रेल्वेसाठी सिंधुदुर्गातील नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या शासकीय निवासस्थानी विशेष बैठक पार पडली. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्थानिक नागरिकांच्या जमिनी संपादित झाल्यानंतरही…

बंदर विकासाला नवा वेग; मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणेंची महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक संपन्न!

महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने, मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत करण्यात आलेल्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.…

पिंगुळीत रंगला संस्कृतीचा महोत्सव; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंची प्रमुख उपस्थिती

कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या संस्थेच्या कार्यामुळे ठाकर संस्कृती टिकून असून पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची कला जगभरात पोहोचली आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी मा. श्रीम तृप्ती धोडमिसे यांनी काढले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणच्या २० व्या…

आरोंद्यात सातेरी भद्रकाली पंचायतनचा भक्तीमय “सप्रक्षेपण विधी सोहळा २०२६” उत्साहात संपन्न

आरोंदा येथे श्री सातेरी भद्रकाली पंचायतन येथे आयोजित “सप्रक्षेपण विधी सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धार्मिक वातावरण अधिकच भारावून टाकले. या विशेष प्रसंगी भाजप युवा नेते मा. विशालजी…

श्री देवी माऊली पंचायतन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विशाल परब दाम्पत्याची उपस्थिती

आडाळी येथील श्री देवी माऊली पंचायतन देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते मा. विशालजी परब यांनी आपली पत्नी सौ. वेदिकाताई परब यांच्यासह मंदिरात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी देवाचे दर्शन घेऊन कोकणच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.आडाळी येथे सध्या…

पेट्रोल, डिझेल, गॅस वापरात काटकसर करा : पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १०) देशवासीयांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर अत्यंत संयमाने करण्याचे आवाहन केले. तेलंगणामध्ये सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी इंधन बचतीवर भर दिला. भारत मोठ्या प्रमाणावर इंधन आयात…

रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाचा रौद्रावतार; मुसळधार पावसाने धास्ती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रत्नागिरी शहरासह चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर आदी भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून…

कलंबिस्त-वेर्ले मार्गावर अपघाताचा गोंधळ, वाहतूक विस्कळीत

सावंतवाडी : कलंबिस्त-वेर्ले मार्गावर शनिवारी दुपारी २ वा. च्या सुमारास टाटा पंच कार आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी अमित लिंगवत, त्यांच्या पत्नी…