कणकवली : अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवल्याच्या व अन्यायाविरुद्ध लढा देत असल्याच्या रागातून समीर सदानंद सामंत (रा. फोंडाघाट बिझलीनगर) यांच्यावर संजय आंग्रे व त्यांच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याची तक्रार दाखल झाली आहे. यात समीर सामंत यांच्या हातातील २८ हजारची अंगठी व २२ हजारची रोख घेऊन गेल्याप्रकरणी संजय आंग्रे यांच्यासह मिथिल अशोक सावंत, समीर भालेकर, प्रकाश शितोळे, राजन नानचे, राजेश कोथंबिरे, विनायक सावंत, विजय लाड, पवन भोगले (रा. सर्व फोंडाघाट) ९ जणांवर गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. ही घटना फोंडाघाट बाजारपेठेजवळ घडली.












