कोकणशाही

कोकणशाही

डिझेल परताव्या बाबत लवकरच सर्व प्रश्न निकाली लागणार ; मंत्री. नितेश राणे

मुंबई : मच्छीमारांना मदत करण्यासाठी सरकार नेहमीच सकारात्मक आहे. पर्ससीन जाळ्यांसह बारा सागरी मैलापर्यंत मासेमारीला परवानगी नाही. त्यामुळे अशा बोटींना डिझेल परतावा मिळणार नाही. मात्र, जे नियमानुसार मच्छीमारी व्यवसाय करतात अशांना त्यांचा डिझेलचा परतावा शंभर टक्के दिला जाईल, असे मत्स्यव्यवसाय…

वादळी वारे आणि तापमान वाढीमुळे आंबा, काजू पिकाला फटका…

जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस जोरदार वादळी वारे वाहत असून, सरासरी तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. याचा फटका आंबा, काजू पिकाला बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे कोवळे काजू बी, आंबा गळून पडल्यामुळे झाडांखाली काजू बी व आंब्यांचा खच पडल्याचे पाहायला मिळत आहे.…

मुंबई-गोवा महामार्ग नक्की कधी पूर्ण होणार? आ.निलेश राणे…

आ. निलेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्ग नक्की कधी पूर्ण होणार? असा सवाल सरकारला केला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे २०१८ साली जेव्हा कोकणात आले त्यावेळी रत्नागिरीमध्ये त्यांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी साडेअठरा हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले होते. त्यामुळे…

महाराष्ट्रात चाललंय तरी काय ? पुन्हा शिवशाही बस मध्ये तरुणी सोबत विनयभंग…

ब्युरो न्यूज कोकणशाही पुण्यात स्वारगेट स्थानकात  शिवशाही मधील मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच शिवशाही बसमध्येच एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केला. आष्टा बसस्थानकातून सांगलीकडे येत…

उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांना मराठी भाषेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही मंत्री नितेश राणे यांनी घेतला आ.आदित्य ठाकरेंचा समाचार

उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांना मराठी भाषेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंना सुनावला मराठी आमच्या राज्याची प्रमुख भाषा,अन्य भाषांचा अपमान न करता मराठी भाषेला प्राधान्य देणे ही शासनाची भूमिका मंत्री नितेश राणे यांनी आमदार…

खरेदीसाठी गेलेल्या दोन महिलांचे पाकीट चोरीला ; एवढी रक्कम…

कुडाळ कुडाळ बाजारपेठेत खरेदीसाठी गेलेल्या दोन महिलांचे पाकीट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. यामध्ये सुमारे १० हजार ५०० रुपये एवढी रक्कम होती. बुधवार आठवडी बाजार असल्याने कुडाळ येथील सोनाली भास्कर सावंत ही महिला बहिणीसोबत खरेदीसाठी आली होती. त्यांनी एका दुकानात किराणा…

जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर

जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल ताशा पथक वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि. ०८ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते १, स्थळ : मालवण मामा वरेरकर नाट्यगृह सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ स्वराज्य संघटना, सिंधुरक्त मिन्न प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन,…

जंगली माकडांच्या उपद्रवामुळे आढळला माकडताप सदृश रुग्ण…

दोडामार्ग तालुक्यात माकडताप सदृश रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. जंगली माकडांच्या उपद्रवामुळे हा ताप फैलावण्याची शक्यता वाढली आहे. ग्रामस्थांनी याबाबत जागृत राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. माकडतापसदृश रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.माकडताप एक…

प्रदूषणमुक्त प्रवास आणि पैशांचीही बचत;सिंधुदुर्गात धावणार एसटीच्या १५० ‘सीएनजी बसेस !

प्रदूषणमुक्त प्रवास आणि पैशांचीही बचत करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात राज्यातील एक हजार एस. टी. बसेस सीएनजी गॅसवर चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यापूर्वी ठाणे आणि रायगड विभागात सीएनजी बसेस सुरू करण्यात आल्या असून, आता सिंधुदुर्गातही सीएनजी बसेस लवकरच धावणार…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत म्हणून टीआयटी ची मंत्री स्वतः घेणार बैठक घेणार ,मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठाकर समाजाचे अनेक प्रश्न निर्णया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था…