कोकणशाही

कोकणशाही

आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत रंगला बैलगाडा शर्यतीचा जल्लोष

मालवण तालुक्यातील मालोंड माळ येथे पारंपरिक आणि थरारक अशा राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत- २०२६ या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाला. या शर्यतीला विशेष आकर्षण लाभले ते म्हणजे आमदार…

माजगावात भर वस्तीत फणसाच्या झाडाला भीषण आग; अग्निशमन दलाने टळवला अनर्थ!

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव वरचीआळी परिसरात भर वस्तीत असलेल्या एका फणसाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्यामुळे आग विझवण्यात यश आले आणि मोठा धोका टळला.माजगाव वरची आळी परिसरात जमिनीवर साठलेल्या पाला-पाचोळ्याला अचानक आग लागली…

“‘आधी चोरी, मग आरडाओरडा’ – मालवण मच्छिमारांचा रत्नागिरीवर निशाणा”

मालवण : सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गातील काही नौका घेरून नौकांवरील मासळी लुटतात व खलाशांना मारहाण करतात असा गंभीर आरोप रत्नागिरी येथील पर्ससीन नेट मच्छिमार संघटनांनी केला आहे. यावर मालवण मधील दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी…

सिंधुदुर्गनगरीत दर शनिवारी ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’चा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी : ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना ताजा शेतमाल मिळावा या उद्देशाने सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशी मधील लोकांच्या सोईसाठी दर शनिवारी ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’ भरविण्यात येणार आहे. शनिवार दिनांक ९ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

“जिल्हा बँकेचा दमदार विकास! दरडोई उत्पन्न वाढीत मोठा वाटा : प्रमोद कामत”

वेंगुर्ला : आर्थिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा लहान असला तरी या वर्षी बँकेने ७ हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. बँकेच्या ठेवींमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. एवढा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष व संचालक मंडळावर ग्राहकांनी, जिल्हावासियांनी दाखवला हे काम कौतुकास्पद आहे.…

देवभूमी कुणकेश्वर सजणार आंब्यांच्या सुगंधाने – ११ मे रोजी महोत्सवाची धूम

  श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे आंबा महोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या महोत्सवात परिसरात हापूस आंब्यांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून भाविकांना विशेष आकर्षण पाहायला मिळणार आहे. यानिमित्त सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने…

देवळी समाजाचा एकत्रित महासंगम! १० मे रोजी कुडाळमध्ये भव्य मेळावा

कुडाळ : देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने देवळी समाजाचा भव्य जिल्हा मेळावा आणि वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, १० मे ला सकाळी १० ते सायंकाळी ३ या वेळेत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे हा मेळावा…

“कुडाळमध्ये इंधनाचा तुटवडा; वाहनधारकांची शहरभर धावपळ”

कुडाळ शहरात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. शहरातील बहुतांशी पेट्रोलपंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने सोमवारी सकाळपासूनच पंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले आहे’ असे फलक पाहायला मिळाले. सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी निघालेले नोकरदार, व्यावसायिक…

वृषाली रेडकर: कोकणच्या संस्कृतीला नवे पंख देणारी ‘कोकणरत्न’

सोशल मीडियावर ‘कोकणची वृषाली’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध कलावंत वृषाली सुधाकर रेडकर येळावीकर यांना यावर्षीचा मानाचा ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग या संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘कला आंगण…

दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा १२वी निकालात ९८.६६% चा दैदिप्यमान यश!

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठाबोर्ड परीक्षा इ. 12 वी ( एच.एस. सी ) 2026 चा निकाल 98.66% लागला.दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा प्रशालेतून फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये…