कोकणशाही

कोकणशाही

महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांनी सहकुटुंब श्री देव वेतोबाचे घेतले दर्शन

वेंगुर्ला – आरवली : महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांनी सहकुटुंब श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवस्थान बाबतची पुरातन माहिती जाणून घेतली व देवस्थानच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले…

देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्त्याला आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते शुभारंभ मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा कार्यक्रमातून देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामासाठी ५ लाख निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…

दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजणार! आचारसंहिता लागण्याची शक्यता?

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अखेर आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून सोमवारी किंवा मंगळवारी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तब्बल चार वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.…

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व लोकर्पण

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच कामगिरी…

भजनी कलाकार आणि वारकरी संप्रदायाला सरकारशी जोडणारा सक्षम दुवा – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली : भजनी कलाकार समितीचे अध्यक्ष म्हणून संतोष कानडे यांनी आपल्या पदाला पूर्ण न्याय दिला असून, योग्य माणूस योग्य ठिकाणी असला की संस्था कशी कार्यक्षम होते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. कणकवली…

मुंबई, गोरेगाव पश्चिम परिसरात भगतसिंग नगर येथील घराला भीषण आग

एकाच कुटुंबातील तिघांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू मुंबई: मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. भगतसिंग नगर येथील एका घराला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. १० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतआहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ८.३० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण.…

मालवण तारकर्ली येथील जयवंत सावंत यांची शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती

मालवण : तारकर्ली येथील जयवंत सावंत यांची शिवसेनेच्या मालवण उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य…

”सिंधुदुर्गातील शाळा वाचवा” पालकमंत्री नितेश राणेंचे शिक्षण मंत्र्यांना लेखी पत्राद्वारे मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थां, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात दिलेला शब्द सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी कृतीत उतरवला आहे. राज्य सरकारचा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला बाधक ठरत असल्याने तो रद्द अथवा सुधारित…

कार दुचाकीचा भीषण अपघात ; एक गंभीर जखमी

कणकवली : जाणवली येथे दुचाकी आणि कार धडकून भीषण अपघात झाला यामध्ये दुचाकी वरील एक जण गंभीर जखमी झाला आहे त्याच्यासोबत आणि एक जण होते ते देखील जखमी झाले आहेत दोघांनाही कणकवलीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सर्वेश डिचवलकर वय…