कोकणशाही

कोकणशाही

माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात रुपेश कानडे अंतिम प्रचारात आघाडीवर

कुडाळ तालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक यावेळी विशेष चर्चेत आहे. महायुतीकडून रुपेश कानडे रिंगणात उतरले असून, त्यांच्या विरोधात काही अपक्ष उमेदवार उभे आहेत. मात्र या लढतीत उबाठा सेनेचे रमाकांत ताम्हणेकर हेच कानडे यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार मानले जात आहेत.…

नेरूरमध्ये थेट लढत : पडते विरुद्ध पावसकर – कौल कुणाच्या पारड्यात? । kokanshahi ।

नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक यावेळी चांगलीच रंगात आली आहे. महायुतीकडून संजय पडते तर ग्राम विकास पॅनलतर्फे अपक्ष म्हणून रुपेश पावसकर रिंगणात उतरले आहेत. ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील नसून, दोन राजकीय विचारधारांमधील थेट संघर्ष म्हणून पाहिली जात आहे. संजय…

नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरणात मोठा बदल

आ. निलेश राणे यांच्याकडून उबाठा सेनेला धक्का देत 150 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश | नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून उबाठा सेनेला मोठा धक्का बसला आहे. सायचे टेंब (नेरूर) येथील उबाठा सेनेचे सुमारे १५० कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत…

उबाठा शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर? गुरुवारी सकाळीच आ. निलेश राणे नेरूर मध्ये होतायत दाखल

आ. निलेश राणे यांच्यावर नेरूरवासियांचा विश्वास वाढता वाढता वाढे साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग – कोकणशाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात गुरुवारी मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. उबाठा शिवसेनेत तीव्र…

हिर्लोक हायस्कूलची भरारी; ‘माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा ३ अंतर्गत विभागीय स्पर्धेसाठी निवड !

कुडाळ : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-३ (सन २०२५-२६) या अभियानात शिवाजी विद्यालय, हिर्लोक हायस्कूलने उल्लेखनीय यश संपादन करत कोल्हापूर विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत हॅट्रिक साधल्यानंतर जिल्हास्तरावर सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावण्याची…

डॉ.तन्मय आठवले यांना दुबईतील ग्लोबल नी समिटसाठी मानाचा आंतरराष्ट्रीय सन्मान

देवगडचे वैद्यकीय प्रतिनिधित्व जागतिक मंचावर देवगड : देवगड मेडिकल फाउंडेशनचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांना संयुक्त अरब एमिरेट्स मधील दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध “ग्लोबल नी समिट” या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले. जगभरातील गुडघा शस्त्रक्रिया व…

‘कमळ’ फुलणारच! विशाल परब यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग; महायुतीच्या उमेदवारांसाठी दोडामार्ग पिंजून काढले । Kokanshahi ।

दोडामार्गमध्ये महायुतीचा झंझावात! विशालजी परब यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह दोडामार्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशालजी परब यांनी तालुक्यात झंझावाती…

नेरूर दुर्गावाड येथे धडाडणार शिवसेनेचे फायरब्रँड आ. निलेश राणे यांची तोफ

नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. नेरूर दुर्गावाड याठिकाणी शिवसेना फायरब्रँड आमदार निलेश राणे यांची तोफ धडाडणार आहे. शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी ठीक 5 वा. आ. निलेश राणे यांच्या कॉर्नर सभेचे याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.…

कवठणी येथील श्री देव काजरोबा जत्रोत्सवात भाजपा युवानेते विशाल परब यांनी घेतले दर्शन

सातार्डा पंचक्रोशीतील कवठणी गावची प्रसिद्ध जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव काजरोबा देवाची जत्रा काल मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमात भाजपा युवानेते विशालजी परब यांनी उपस्थित राहून देवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि श्री…

अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग दरम्यान अपघात

आज बारामतीत अजित पवार यांची सभा होती. या सभेला पोहचण्यासाठी निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग दरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.