कोकणशाही

कोकणशाही

चालकाच्या प्रसंगावधाना मुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला !

राजापूर : प्रतिनिधी सांगलीहून राजापूरकडे येणाऱ्या येथील आगाराच्या एस्टी बसला सोमवारी अणुस्कूरा घाटात सकाळी साडेदहाच्या दरम्यान अपघात घडला. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. एसटी चालक…

उद्योगजकांसाठी नवा प्रस्ताव बनवा; आ.निलेश राणे

कुडाळ प्रतिनिधी , कुडाळ एमआयडीसीमध्ये असलेले आजारी उद्योगांना नवसंजीवनी आणि नव्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी पर्यायी जागा मिळाली नाही तर मंजूर…

मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्याचा तात्काळ ‘इफेक्ट’ ; मत्स्यखाते ‘अलर्ट मोड’ वर

रत्नागिरी । प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला असून गस्ती दरम्यान दोन LED light मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना…

सावंतवाडीतील विद्यालयात मुलांवर रॅगिंगसह लैंगिक शोषणचा प्रकार…

तालुक्यातील एका नामांकित विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सहावीत व सातवीत शिकणाऱ्या मुलांवर रॅगिंगसह लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित शोषित विद्यार्थ्यांच्या पालकांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सोमवारी पोलिस ठाण्यात संबंधित विद्यालयाच्या…

प्रत्येक घरात रोजगाराचा निर्धार ; खासदार नारायण राणे…

कणकवली : प्रतिनिधी टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकारांना एकदा प्रत्यक्ष पहावे यासारखा दुसरा आनंद नाही. माझ्या जिल्हावासीयांनी कलेचा आनंद लुटावा म्हणून सिंधु पर्यटन महोत्सव सुरू केला. पर्यटनातून आर्थिक समृद्धी सिंधुदुर्गात यावी, यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत. सी वर्ल्ड होणार, वैभववाडी कोल्हापूर…

प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरूवात; पौष पोर्णिमेस ५० लाख लोकांनी केले स्नान.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सोमवारी महाकुंभाला सुरूवात होत आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि आस्थेचे प्रतीक म्हणजे हा महाकुंभ दर १२ वर्षांनी आयोजित होतो. महाकुंभ भारताच्या पौराणिक पंरपरा आणि अध्यात्मक वारसेचा उत्सव आहे. दर १२ वर्षांनी प्रयागराजच्या संगमाच्या किनारी महाकुंभाचे आयोजन होते.…

नारायण राणे यांनी घेतला चिपी विमातळावरून वैभव नाईक यांचा खरपूस समाचार…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी, सिंधूदुर्ग कणकवली पर्यटन महोत्सवात नारायण राणे हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळाले. यावेळी नारायण राणे यांनी वैभव नाईक यांचा चांगलाच समाचार घेतला.चिपी विमानतळाला टाळ मारणार..कधी जातोस साग रे मला…टाळ मारूनच दाखव…नाही तुझ्या घराला टाळ मारलं ना तर नारायण राणे…

रत्नागिरी शेणाळे घाटात लालपरीचा भीषण अपघात…

रत्नागिरी प्रतिनिधी, मंडणगडच्या शेणाळे घाटात लालपरीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बस रात्रीच्या सुमारास दाभोळवरून मुंबईच्या दिशेने येत होती. घाटातील उतारावरून जात असताना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस घरंगळत दरीत कोसळली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या…

विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध आ.निलेश राणे

सिंधुदुर्ग प्रतिनिधी, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकास साठी कटीबद्ध आहे असे प्रतिपादन आ.निलेश राणे यांनी केले आहे. पावशी व आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी आ. निलेश राणे यांच्या हस्ते…

पुतळा प्रकरणी दोषींवर कारवाई ऐवजी मदत-हुसेन दलवाई

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनुभव नसलेल्या, ज्ञान नसलेल्या आणि महाराजांप्रति श्रद्धा नसलेल्या माणसानी उभारला.यामुळेच तो कोसळला. पुतळा वाऱ्याने पडावा इतके या पुतळ्याचे काम तकलादू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सगळी…