कोकणशाही

कोकणशाही

कलंबिस्त-वेर्ले मार्गावर अपघाताचा गोंधळ, वाहतूक विस्कळीत

सावंतवाडी : कलंबिस्त-वेर्ले मार्गावर शनिवारी दुपारी २ वा. च्या सुमारास टाटा पंच कार आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी अमित लिंगवत, त्यांच्या पत्नी…

निसर्गाचा तांडव कायम: सिंधुदुर्गात तिसऱ्या दिवशीही वादळी पाऊस

कणकवली : सिंधुदुर्गात गुरुवारपासून सातत्याने वळवाचा पाऊस पडत आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशीही पावसासोबतच वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे घरे तसेच विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी…

गोठोसला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घरांचे मोठे नुकसान

कुडाळ तालुक्यात आज झालेल्या वातावरणातील बदलाचा मोठा फटका गोठोस गावाला बसला आहे. सोसाट्याचा वाऱ्यामुळे येथील ग्रामस्थ राजाराम धोंडू खरात यांच्या घरावरील व समोरील मंडपाचे सर्व पत्रे उडून गेले असून, या दुर्घटनेत त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची मोठी घोषणा; कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

कणकवली शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीतर्फे व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या आठ दिवसांत शहरात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. यासाठी स्वतंत्र ॲक्शन प्लॅन तयार…

खारेपाटण गाव अंधारात बुडाले; रात्रभर वीजपुरवठा खंडित

कणकवली : तालुक्यात वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे खारेपाटण गावातील वीज व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून गाव काल सायंकाळी चार वाजल्यापासून रात्रभर अंधारात आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे तब्बल 7 ते 8 विद्युत पोल निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे. वीजपुरवठा खंडित…

आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली पाणीटंचाईवर महत्त्वपूर्ण बैठक

कुडाळ तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज पंचायत समिती, कुडाळ येथे महत्त्वपूर्ण वार्षिक आढावा सभा पार पडली. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध गावांतील पाणीपुरवठा स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना…

‘हिंदू एकतेसाठी संघटित व्हा’; विराट हिंदू संमेलनात पालकमंत्री नितेश राणेंचे आवाहन

एखतपूर-मुंजवडी, पुणे एखतपूर-मुंजवडी, पुणे येथे सकल हिंदू समाज, भुलेश्वर उपखंड आयोजित विराट हिंदू संमेलनास मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून हिंदू बांधवांना संबोधित करण्याची संधी लाभली. आपल्या पवित्र हिंदू धर्माच्या एकतेसाठी सर्वांनी संघटित होणं गरजेचं…

सिंधुदुर्गातील परिस्थितीवर पालकमंत्री नितेश राणे यांचे बारकाईने लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री Nitesh Rane यांनी सोशल मीडियावरून नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले…

कासार्डेत दुचाकी चोरी; चोरटा CCTV मध्ये कैद

कणकवली : कासार्ड-आनंदनगर येथे उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबतची तक्रार राजू आत्माराम कदम (रा. कासार्डे, धुमाळवाडी) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ मे रोजी पहाटे ३.१८ वाजण्याच्या…

सागरी महामार्गावर स्वच्छतेचा बिगुल; नगरपालिकेची व्यापक मोहीम सुरू

सागरी महामार्गावर स्वच्छता मोहीम उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित शहरातील सर्व दहाही प्रभागात स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवणार : पूनम चव्हाण मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी…