राणेंवर बोलण्यासाठी ठाकरेंनी तुम्हाला ठेवलेय!
कुडाळ: प्रतिनिधी
वैभव नाईक तुम्ही निवडणुकीत आमदारकीचे तिकिट मिळावे यासाठी तुम्ही कुठे कुठे गेलात? हे सर्वज्ञात आहे. आमदारकीच्या १० वर्षात केवळ बारसे, लग्न आणि सत्यनारायण पूजा करीत राहिलात म्हणून तुम्हाला जनतेने नाकारले. विकासाची कामे केली असती तर हे झालेच नसते. तुम्ही फक्त राणे कुटुंबावर बोलता त्यासाठीच तुम्हाला ठाकरेंनी ठेवले आहे. त्यामुळे “निष्ठावंत” हा शब्द तुम्हाला लागू होत नाही. आज जिल्ह्यात उबाठा सेनेची स्थिती पहा याला कारणीभूत तुम्ही आणि विनायक राऊत आहेत. केवळ लोकांना विकासाची आश्वासने दिलात आणि काम शून्य केलात. त्यामुळे विकासाच्या बाता आम्हाला शिकवू नका! आता राणे कुटुंब, रवींद्र चव्हाण यांची नावे घेऊन तुम्ही लोकांची तुमच्यावरील नाराजी दूर करू पाहात आहात. पण लक्षात ठेवा २०२९ मध्ये निलेश राणे हेच कुडाळ-मालवणचे आमदार असतील ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. त्यामुळे तुम्ही ठाकरेना सोडून काँग्रेसमध्ये जा !नाहीतर राजकारण सोडून क्रशर सांभाळा हा सल्ला समजा, असा उपरोधिक टोला युवासेना उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ यांनी वैभव नाईक यांना लगावला आहे.












